आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- खासदार राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
- धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूकीच्या वैध उमेदरवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
- आज राष्ट्रीय जंतनाशक दिन
- अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यावर आज प्रयागराज मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही उपस्थित राहणार आहेत.
- IPL 2021 च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात झाली असून आज पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स असा सामना सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे.
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- मुंबई - राज्यात सोमवारी (२० सप्टेंबर) २ हजार ५८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. २८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार ८३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६५ लाख २४ हजार ४९८ वर पोहोचली असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६३ लाख ४० हजार ७२३ तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ३८ हजार ५४६ वर पोहोचली आहे. सविस्तर वाचा...
- अबुधाबी - कोलकाता नाइट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह केकेआरचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. केकेआरच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर आरसीबीचा संघ 19 षटकात 92 धावांवर सर्वबाद झाला. तेव्हा केकेआरने हे आव्हान 1 गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. शुबमन गिलने 34 चेंडूत 48 धावांची खेळी साकारली. सविस्तर वाचा...
- पिंपरी-चिंचवड (पुणे) - भोसरीत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीला मूल होत नाही म्हणून चक्क पत्नीवर जादूटोणा करून तिला कोंबडीचे रक्त पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती हा लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याने मूल होत नाही म्हणून सासऱ्याने मीच मूल देतो असे म्हणून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - एकीकडे गणेश विसर्जन सुरू असताना अनंत चतुर्दशी दिनी रात्री ९ च्या सुमारास ५ मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी २ जणांना वाचवण्यात यश आले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ मुलगा अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. सविस्तर वाचा...
- लखनौ - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा प्रयागराज जिल्ह्यात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मठामधील लोकांची चौकशी सुरू आहे. सविस्तर वाचा...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य -