- मुंबई : राज्यपालांचे अभिभाषण याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रत्येक मुद्द्याला प्रत्युत्तर दिले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाजपने केलेल्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला. "शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं नाही. बाबरी मशीद पाडली तेव्हा, येडे गबाळे पळून गेले मात्र बाळासाहेब उभे राहिले" अशी जळजळीत टीका त्यांनी विरोधकांवर केली. यासोबतच काश्मीरमध्ये पीडीपी सोबत मांडीला मांडी लावून सत्ता भोगली त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सविस्तर वाचा- 'शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आमचं नाही, काश्मीरमध्ये सत्ता आणली तेव्हा हिंदुत्व कोठे गेलं होतं?'
- मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ,अनुराग कश्यप व विकास बहलच्या घरी आयकर विभागाच्या पथकाकडून धाडी मारण्यात आल्या आहेत. या तिघांच्या मुंबईतील निवासस्थानी व कार्यालयावरही छापेमारी सुरू असल्याची माहिती आयकर खात्याच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
सविस्तर वाचा- तापसी पन्नू, अनुराग कष्यप आणि विकास बहलच्या घरावर आयकर विभागाची धाड
- मुंबई - जळगाव जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहात महिलेला आक्षेपार्ह अवस्थेत पोलिसांनी नाचायला लावले. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी ४ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
सविस्तर वाचा- जळगाव वसतिगृह प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार - गृहमंत्री अनिल देशमुख
- जळगाव - येथील वसतिगृहात दोन महिलांमधील वाद व वसतिगृहातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचे चौकशी पथक नेमले आहे. त्यात एक महिला अधिकारी, पोलीस अधिकारी, दोन तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. चौकशीत जे समोर येईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
सविस्तर वाचा- वसतिगृह प्रकरण : वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या पथकाकडून चौकशी - जिल्हाधिकारी राऊत
- मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड यांचे प्रकरण ताजे असताना आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्याने आत्महत्या प्रकरणात एफआयआर बदलल्याचा धक्कादायक प्रकार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी परिषदेत उघडकीस आणला. तसेच याप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.
सविस्तर वाचा- महिलेल्या फसवलेल्या 'त्या' आमदाराची सीआयडी चौकशी करा - प्रविण दरेकर
- मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. युती तोडल्याच्या कारणावरून बोलताना त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर जाऊन त्यांनी वेगळ्याच प्रकारे सांगितली, असे ते म्हणाले. कोरोना केंद्रामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप नाकारत महाराष्ट्राने कोरोनाची लढाई समर्थपणे लढली, आम्ही केले ते सर्व शून्य आहे, असे समजू नका, असे ते म्हणाले.
सविस्तर वाचा- महाराष्ट्राने कोरोनाची लढाई समर्थपणे लढली - मुख्यमंत्री
- चेन्नई : तामिळनाडूमधील तिरुवरुर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ज्योतिषीच्या सांगण्यावरुन एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षाच्या मुलाला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. साईसरण असे या दुर्दैवी चिमुरड्याचे नाव आहे. तर, रामकी (२९) असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वाचा- अंधश्रद्धेचा बळी : बापानेच पाच वर्षांच्या मुलाला जिवंत जाळले; तामिळनाडूमधील धक्कादायक प्रकार
- नवी दिल्ली : भारताला घाबरवण्यासाठी चीनने आपल्या पारंपारिक आणि सायबर सैन्याला एकत्रित केले आहे, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. तसेच, भारत सरकारच्या भित्रेपणामुळे भविष्यात आपले मोठे नुकसान होणार आहे, असा इशाराही त्यांनी एका ट्विटमधून दिला.
सविस्तर वाचा- भारताला घाबरवण्यासाठी चीनने पारंपारिक आणि सायबर सैन्य एकत्र केलंय - राहुल गांधी
- मुंबई - लॉकडाऊन उठल्यानंतर सर्वप्रथम टेलिव्हिजन मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले. वर्षभर अडकलेले नवीन प्रोजेक्ट्स मार्गी लागले आणि प्रेक्षकांना आता नवनवीन मालिका पाहायला मिळत आहेत. झी मराठीवर ‘उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा’ सुरु झाला असून मार्च महिन्यात दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापैकी 'पाहिले न मी तुला' या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली असून 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा नाईकही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सविस्तर वाचा- झी मराठीवर ‘उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा’!
- मुंबई - अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवतिया इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेपूर्वी झालेल्या तंदुरुस्तीच्या चाचणीमध्ये अपयशी ठरला आहे. राहुल तेवतियाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, तो तंदुरुस्तीच्या चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊ शकला नाही.
सविस्तर वाचा- एकाच षटकात ५ षटकार ठोकणारा खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये 'फेल'!