आज दिवसभरात -
- केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यात आज पावसाची शक्यता
नवी दिल्ली - केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच दिल्लीमधील काही भागांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई - राज्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आजदेखील मराठवाडा, विदर्भा, मध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
- आज जाहीर होणार सेटची उत्तरतालिका
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण 15 शहरांमध्ये सेटची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची उत्तरतालिका आज जाहीर होणार आहे.
- केंद्रीय मंत्री भारती पवार आज पुण्यात
पुणे - केंद्रीय मंत्री भारती पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्या आज पुणे पालिकेत बैठक घेणार आहेत. शहरातील आरोग्यासंबंधी विविध विषयावर त्या आज आढावा घेणार आहेत.
- कालच्या बातम्या -
- तिरुवनंतपुरम - केरळमध्ये शनिवारी, रविवारी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे केरळमधील अनेक नद्यांना पूर आला आहे. या पुरात आणि विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये 12 जण बेपत्ता झाले होते. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी रविवारी सकाळी बेपत्ता नागरिकांचा शोध घेत त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
वाचा सविस्तर - Kerala Flood : पावसाचा कहर; आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून पूरस्थितीचा आढावा
- श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांची गोळ्या घालून हत्या केली असून, तर तिसरा मजूर जखमी झाला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला असून, सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
वाचा सविस्तर - दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य; कुलगाममध्ये दोन परप्रांतीय मजुरांची हत्या
पुणे - ईडी, शिडी, सीबीआय काय वापरायचे ते वापरा, परंतु महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे काम करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते पिंपरी - चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
वाचा सविस्तर - ईडी, शिडी लावली तरी हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार - शरद पवार
चंद्रपूर - पवार कुटुंबियांवर आरोप करणे हे काही नवीन नाही. आता या गोष्टींची आम्हाला सवय झाली आहे. निव्वळ आरोप होतात पुढे त्याचे काहीच होत नाही. भ्रष्टाचाराचे ट्रकभर पुरावे होते, पुढे त्याचं काय झालं? मात्र पवार कुटूंबियांवर असे आरोप करणारे मात्र मोठे होत असतात. जर आमच्यामुळे कोणी मोठं होत असेल तर ही चांगलीच बाब आहे. हा तर एक सामाजिक बांधिलकीचा प्रकार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. त्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी चंद्रपूर येथे आल्या होत्या.
वाचा सविस्तर - पवार कुटुंबीयांवर आरोप करणारे मोठे होत असतात.. सुप्रिया सुळेंचा किरीट सोमैयांना टोला
- मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन गेले काही दिवस 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात घट होऊन 11 ऑक्टोबरला 1736, 16 ऑक्टोबरला 1553 तर आज 17 ऑक्टोबरला 1715 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 29 मृत्यूंची नोंद झाली असून 2 हजार 680 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.39 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
वाचा सविस्तर - Corona Update - तिसऱ्यांदा कमी रुग्णांची नोंद, 1715 नवे रुग्ण, 29 रुग्णांचा मृत्यू
- वाचा आजचे राशीभविष्य -