- आज दिवसभरात -
- काँग्रेस कोअर कमिटीची नवी दिल्लीत बैठक
नवी दिल्ली - येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यादेखील उपस्थित राहणार आहेत.
- प्रबोधनकार ग्रंथांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज प्रकाशन
प्रबोधनकारांच्या विचारांचा समृद्ध वसा आणि जतन करण्यासाठी तसेच हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने 'प्रबोधन'मधील प्रबोधनकार हा त्रिखंडात्मक संपादित ग्रंथ साकारला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे.
- पुणे विमानतळ 30 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद
पुणे - आजपासून पुणे विमानतळ १४ दिवसांसाठी बंद राहणार आहे. भारतीय वायुसेना (IAF) धावपट्टीच्या पुनरुत्थानाचे काम हाती घेणार आहे. ३० ऑक्टोबरपासून विमानतळ ३० नोव्हेंबरपर्यंत रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत १२ तास बंद राहील.
- राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई - राज्यात आजपासन पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
- आज मुंबई हायकोर्ट राहणार बंद
१5 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर सलग पाच दिवस मुंबई उच्च न्यायालयाचं कामकाज बंद असेल. 16 आणि 18 ऑक्टोबर हे कामाचे दिवस अनुक्रमे 27 नोव्हेंबर आणि 4 डिसेंबर हे दोन शनिवारी भरून काढणार असल्याचं हायकोर्ट प्रशासनाकडूनं जाहीर करण्यात आले आहे.
- कालच्या बातम्या -
- ठाणे - भिवंडीत आगीचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच भिवंडी, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ४ ते ५ अग्निशामक गाड्या जवानांसह घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.
वाचा सविस्तर - भिवंडीत फर्निचर गोदामासह कारखान्याला भीषण आग; अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल
- जशपूर(छत्तीसगड) - जशपूरमध्ये शुक्रवारी दसऱयाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांना एका भरधाव कारने चिरडल्याची घटना घडली आहे. यात जवळपास 20 जण जखमी झाले असून, प्रशासनाच्या माहितीनुसार यात एकाचा मृत्यू झाला आहे. पण, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमींना पत्थलगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जशपूर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये कारने अक्षरक्षा भाविकांना चिरडले.
वाचा सविस्तर - छत्तीसगडमध्ये दुर्गा विसर्जनादरम्यान कारने भाविकांना चिरडले; 1 ठार, 20 जखमी... पाहा VIDEO
- कोल्हापूर - शिवसेनेला अचानक राम मंदिर आणि हिंदुत्व आठवत आहे. हे काहीतरी वेगळेच संकेत देत आहेत, असं सूचक वक्तव्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या दसरा महोत्सवातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठे होता? असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, असे विचारत असताना मुख्यमंत्र्यांना इतिहास माहिती असावा लागतो, अशा शब्दात पाटील यांनी टोला लगावत, स्वातंत्र्य काळात तुम्ही कुठे होता? असा सवालही पाटील यांनी केला.
वाचा सविस्तर - स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही कुठे होता? चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा आज (शुक्रवार) षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून हिंदूत्वावरुन भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हिंदूत्वाला धोका हा परक्यांपासून नाही तर आपल्याच नवहिंदूंपासून आहे, अशी टीका त्यांनी दसरा मेळाव्यात संबोधित करताना केली.
वाचा सविस्तर -नवहिंदूंपासूनच हिंदूत्वाला धोका; मुख्यमंत्र्यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह केंद्रावर सोडले टिकास्त्र
- मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेसाठी राज्य सरकारचे दोन वर्षातील योगदान व सरकारची पुढील दिशा काय असेल याची माहिती राज्याच्या कोटयवधी जनतेला आजच्या भाषणातून मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत काय कामं झाली हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून केली.
वाचा सविस्तर - मुख्यमंत्र्यांच्या भाषणात केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचा पोटशूळ - प्रवीण दरेकर
- वाचा राशीभविष्य आणि प्रेरणा -
VIDEO : 16 ऑक्टोबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य