आज दिवसभरात या महत्त्वाच्या घडामोडींवर असणार नजर
- आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई - आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी एनसीबीला अनेक प्रश्न विचारले होते. मात्र, एनसीबीने रितसर उत्तर देण्यासाठी न्यायालयाला वेळ मागितला होता. त्यानुसार न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी तहकूब केली होती.
- आज मंत्रिमंडळाचा बैठक
मुंबई - आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील विविध प्रश्नांवर या बैठकील चर्चा होणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कारवाईवरही यात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या बैठकीनंतर मंत्र्यांच्या प्रतिक्रिया पाहणे महत्वाचे असणार आहे.
- शरद पवार यांची पत्रकार परिषद
मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत राज्यातसुरू असलेल्या कारवाईवर शरद पवार बोलणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
- किरीट सोमैया यांची आज पत्रकार परिषद
पुणे - माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमैया यांची आज पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे. ईडी, सीबीआय, एनसीबी यांच्यामार्फत राज्यात विविध ठिकाणी कारवाई सुरू आहेत. त्यामुळे किरीट सोमैया या विषयावर भाष्य करतील.
- कालच्या महत्वाच्या घडामोडी -
मुंबई - पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळून लावला आहे. यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणास्तव तूर्तास दिलासा देऊन कोर्टाने पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला ठेवली आहे.
वाचा सविस्तर - एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी
औरंगाबाद - करमाडजवळील जडगाव येथे तलावात कार पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (12 ऑक्टोबर) घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. वैजीनाथ उमाजी चौधरी (वय 52), मंगल वैजीनाथ चौधरी (वय 45), सुकन्या मधुर चौधरी (वय 22) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. एकलेरा देवीच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.
वाचा सविस्तर - औरंगाबाद : देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या चौधरी कुटुंबियांवर काळाचा घाला, कार पाण्यात पडून तिघांचा मृत्यू
औरंगाबाद - ओबीसी आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटा हा शब्द ऐकून कान किटले आहेत. इम्पिरिकल डेटा केंद्राने नाही दिला तर, राज्य शासन का अडकून पडत आहे. राज्य सरकरने त्यांची भूमिका घ्यावी, असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात व्यक्त केले.
वाचा सविस्तर -ओबीसी अध्यादेश आधी काढला असता तर फायदा झाला असता - पंकजा मुंडे
पुणे - शहरात आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीची कोयत्याने मानेवर वार करून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बिबवेवाडी मधील यश लॉन्स परिसरामध्ये मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाचा सविस्तर -धक्कादायक : कब्बडी खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मानेवर कोयत्याने वारकरून केली निर्घृण हत्या
कराड (सातारा) - कोळसा टंचाईमुळे देशातील औष्णिक वीज प्रकल्प अडचणींचा सामना करत असताना कोयना प्रकल्पात दिवसाला सुमारे 1500 मेगावॉट वीज निर्मिती सुरू आहे. तसेच पुढील आणखी काही दिवस अतिरिक्त वीज निर्मिती सुरू ठेवणार असल्याची माहिती कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या अधिकार्यांनी दिली.
वाचा सविस्तर - कोयनेच्या चार टप्प्यांतून 1500 मेगावॅट वीजनिर्मिती
- आजचे राशिभविष्य -
VIDEO : 13 ऑक्टोबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य