- नक्षलवादी हल्ला : हुतात्मांना आज श्रद्धांजली वाहिली जाणार
छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नलक्षलवाद्यांमध्ये शनिवारी मोठी चकमक झाली होती. यात सीआरपीएफचे पाच जवान हुतात्मा झाल्याची माहिती समोर आली होती. तर रविवारी बीजापूरमधील चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांची संख्या 22 वर पोहोचली. या हुतात्मा जवानांना आज बस्तर येथे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. दरम्यान, या चकमकीत एका महिला नक्षलवाद्यासह दोन पुरूष नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
- आजपासून नवी नियमावली
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश आणि नियमावली आज सोमवारी सरकारकडून काढण्यात येणार आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
- परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सुनावणी
उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवल आज सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांनी आपल्या बदलीला आव्हान देणारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी व्हावी, या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
- बिहार : दहावीचा आज ऑनलाइन निकाल
आज बिहारच्या १० वीच्या बोर्डाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी ३ वाजून ३० मिनिटानंतर अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. जवळपास १७ लाख विद्यार्थ्यांचा निकालाची घोषणा होणार आहे. ही परीक्षा १७ ते २४ फेब्रुवारी या दरम्यान झाली होती.
- आजपासून विनाआरक्षण करता येणार रेल्वे प्रवास
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे, पण याचदरम्यान रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. प्रवाशांसाठी रेल्वेने आता राखीव नसलेल्या गाड्या सुरू निर्णय घेतला आहे. उत्तर रेल्वेने एकूण ७१ अनारक्षित मेल आणि एक्सप्रेस रेल्वेंची यादी जाहीर केली आहे.
- शेतकरी आंदोलनाचा 129 वा दिवस
केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनचा 129 वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात या प्रश्नी अनेकदा चर्चा झाली मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
- भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद
भाजप नेते किरीट सोमय्या हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यात ते राज्य सरकारने घेतलेल्या अंशत: लॉकडाऊन संदर्भात आपले मत मांडण्याची शक्यता आहे.
- ट्यूलिप फेस्टिवलचा तिसरा दिवस
श्रीनगरमधील ट्यूलिप गार्डनमध्ये 'ट्यूलिप फेस्टिवल' सुरू आहे. या फेस्टिवलचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, हे गार्डन 25 मार्चपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आले आहे. जवळपास 35 हेक्टरमध्ये हे गार्डन असून यात 62 वेगवेगळ्या जातीची 15 लाख ट्यूलिप आणि इतर झाडे लावण्यात आली आहेत.
- वय वर्ष 45 वरिल नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा पाचवा दिवस
देशभरात 45 वर्षावरिल नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. या लसीकरणाचा आज पाचवा दिवस आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्रात ३ लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. हा देशभरातील उच्चांक ठरला.
- रश्मिका मंदानाचा आज वाढदिवस
'नॅशनल क्रश' अशी ओळख असलेली टॉलीवूडची अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा आज वाढदिवस. रश्मिकाने तेलगू, तमिळ चित्रपटात चांगले नाव कमावले आहे. ती लवकरच बॉलीवूडमध्येही पदार्पण करणार आहे. तिचा 'मिशन मजनू' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे.