ETV Bharat / bharat

News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर - वीज दर न्यूज

News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर

todays-important-news

author img

By

Published : Apr 1, 2021, 5:00 AM IST

  • आजपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहीम

देशात कोरोना लसीकरणाच्या आणखी एका टप्प्याला आजपासून सुरूवात होणार आहे. यात ४५ वर्षांवरिल सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाच्या संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली. यात त्यांनी देशात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. या टप्प्यात लसीकरणाचा वेग वाढवून कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.

todays-important-news
कोरोना लसीकरण
  • पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान; ममता-सुवेंदू थेट भिडणार

बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 30 मतदारसंघांसाठी 27 मार्चला मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. देशाचे लक्ष लागलेल्या नंदीग्राम मतदारसंघातही आज मतदान होत आहे. नंदीग्रामच्या मैदानातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डरकाळी फोडली आहे. तर ममता यांच्या विरोधात भाजपने दीदींचा तृणमूल काँग्रेस सोडलेल्या सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे.

todays-important-news
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
  • आसाममध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान

आसाम विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होत आहे. 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात, 39 विधानसभा मतदार संघातून 345 उमदेवार आपले नशीब आजमावणार आहेत. 73 हजार 44 लाख 631 नागरिक मतदानाचा हक्क बजावतील.

todays-important-news
आसाम विधानसभेसाठी मतदान
  • शेतकरी आंदोलनाचा १२५ वा दिवस

केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनचा १२५ वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात या प्रश्नी अनेकदा चर्चा झाली मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

todays-important-news
शेतकरी आंदोलन
  • दिल्ली-मेरठ महामार्ग आजपासून खुला

दिल्ली-मेरठ महामार्गाचे काम पूर्ण झाले असून प्रवासासाठी हा महामार्ग आजपासून खुला करण्यात येणार आहे. जवळपास ८२ किलोमीटरचे अंतर या महामार्गामुळे ६० मिनिटात कापले जाईल. या महामार्गमुळे दिल्ली आणि गाजियाबादला येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडी होणार नाही. दरम्यान, या महामार्गावरिल टोल रक्कम अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

todays-important-news
दिल्ली-मेरठ महामार्ग खुला
  • अमित शाह आज तामिळनाडूत

आमित शाह तामिळनाडू विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आज तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. ते आज पाँडिचेरीमध्ये रोड शो करणार आहेत. दरम्यान, तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. राज्यात ६ एप्रिल रोजी मतदान होईल. तर २ मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राज्यात एकूण ६ कोटी २८ लाख २३ हजार ७४९ मतदार उमेदवारांची निवड करणार आहेत.

todays-important-news
आमित शाह
  • मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि स्टॅलिन यांचा प्रचार दौरा

मुख्यमंत्री एडाप्पडी पलानीस्वामी आणि डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन आज कोयंबटूर येथे प्रचार करणार आहेत. राज्यात ६ एप्रिल रोजी २३४ मतदार संघांसाठी मतदान होईल. तर २ मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

todays-important-news
मुख्यमंत्री पलानीस्वामी
  • देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद होणार आहे.

todays-important-news
देवेंद्र फडणवीस
  • टोल दरवाढ

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गासह पुणे ते नाशिक आणि पुणे ते सोलापूर महामार्गावरिल टोल दरात वाढ करण्यात आली आहे. खेड-शिवापूर आणि आणेवाडी या दोन्ही टोलनाक्यांवर १ एप्रिलपासून ५ टक्के टोलवाढ होणार आहे.

todays-important-news
टोल दल वाढ
  • विराट कोहली आज चेन्नईत दाखल होणार

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी सर्व खेळाडू आपापल्या संघासोबत जोडले जाऊ लागले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली देखील संघासोबत जोडला जाणार आहे. तो आज चेन्नईत दाखल झालेल्या बंगळुरू संघासोबत आज सराव करणार आहे.

todays-important-news
विराट कोहली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.