प्रकाश जावडेकर पुण्यात आगा खान पॅलेसच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील.
![केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10987284_javadekar1.jpg)
औरंगाबादमध्ये आजपासून लॉकडाउन
औरंगाबाद शहरात कोरोना वाढत असल्यामुळे आजपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
![लॉकडाउन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10987284_lockdown.jpg)
कोकण-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, हवामान विभागाचा ताजा अंदाज
हवामान विभागानं महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे. पूर्व विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यात 12 मार्च ते 13 मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत.
![कोकण-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटांसह पाऊस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10987284_rain.jpg)
केंद्रीय आरोग्यमंत्री एम्सची पाहणी करतील
आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन सिंह भोपाळ दौर्यावर असतील. केंद्रीय मंत्री सकाळी 9 वाजता ग्रीन इमारतीचे उद्घाटन करतील. याशिवाय भोपाळ एम्सची तपासणी करण्यासाठीही जातील. यासह इतरही अनेक कार्यक्रमांचा यात समावेश असेल.
![केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन सिंह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10987284_dr.jpg)
नवी दिल्ली: भाजपा मध्यवर्ती निवडणूक समितीची आज बैठक
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (आज) शनिवारी बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही समिती चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात होणार्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करणार आहे.
![पंतप्रधान नरेंद्र मोदी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10987284_modi.jpg)
आज राकेश टिकैत बंगालमध्ये पोहोचले. ते कोलकाता आणि नंदीग्राम येथे शेतकरी मेळावा घेणार आहेत.
आज भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत पश्चिम बंगाल येथे पोहोचले. राकेश टिकैत कृषी कायद्याच्या विरोधात कोलकाता आणि नंदीग्राम येथे शेतकरी मेळावा घेणार आहेत.
![भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10987284_rakesh.jpg)
एनईईटी (यूजी) परीक्षा 1 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय चाचणी संस्थेने केली
![एनईईटी (यूजी) परीक्षा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10987284_neet.jpg)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: जावडेकर आज सात प्रदर्शनांचे करणार आहेत उद्घाटन
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर देशाच्या स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' कार्यक्रमाच्या अंतर्गत (आज) 13 मार्च रोजी सात ठिकाणी डिजिटल प्रदर्शनांचे उद्घाटन करतील. या संदर्भात माहिती व प्रसारण मंत्रालयाने सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गांधीनगरमधील साबरमती आश्रमात मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. एकूण 37 राज्यस्तरीय प्रदर्शनांचे उद्घाटन प्रख्यात लोकांच्या हस्ते होणार आहे.
![केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10987284_javdekar.jpg)
राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज (१३ मार्च) रोजी वाराणसी दौऱ्यावर
देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे १३ मार्च रोजी वाराणसीत तीन दिवसांच्या दौर्या वर येणार आहेत. 13 ते 15 मार्च दरम्यान राष्ट्रपती वाराणसी तसेच मिर्जापूर आणि सोनभद्र येथे जाणार आहेत. राष्ट्रपती 13 मार्च रोजी संध्याकाळी मां गंगाच्या विशेष महाआरतीस उपस्थित राहतील. 14 मार्च रोजी मिर्जापूर आणि सोनभद्र जिल्ह्यात असतील.
![राष्ट्रपती राम नाथ कोविंद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10987284_kovind.jpg)
वृंदावन कुंभ: तिसरे आणि अंतिम शाही स्नान आज, तीर्थनगरीमध्ये बाह्य वाहनांच्या प्रवेशावर बंदी
आज वृंदावन कुंभ संमेलनाचे तिसरे आणि अंतिम शाही स्नान आहे. शाही स्नानाची प्रथा म्हणून त्यानुसार प्रथम संतांची शाही पेशवाई निघेल. त्यानंतर शाही स्नान होईल. यासाठी शुक्रवारी कर्मचारी यमुना किनाऱयावर दिवसभर तयारीमध्ये व्यस्त होते. शनिवारी बाहेरील वाहनांच्या प्रवेशावरील निर्बंध तसेच सर्व पासही अवैध ठरविण्यात आले आहेत. व्यवस्था पाहण्यासाठी डीएम आणि एसएसपी देखील घटनास्थळी हजर असतील.
![वृंदावन कुंभ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10987284_vrundavan.jpg)