दिल्ली - महाराष्ट्रातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना पुढे येत आहे. यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष प्रियांका कानूंगो यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारवर निशाना साधला आहे.
महाराष्ट्र पोलिसांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे आम्हाला वाटते. अशा प्रकारच्या घटनांवर वेळेत कारवाई ते करू शकत नाही. ते समाजापुढे चुकीचे उदाहरण मांडत आहेत. राज्य सरकार देखील पीडितेच्या पुनर्वसाणाबाबत उदासीन आहे, असे प्रियांका म्हणाल्या.
याप्रकरणी आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचित केले आहे आणि त्यांना पूर्ण अहवालाची मागणी केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत असे अनेक प्रकार घडत असल्याचे आम्ही पाहिले आहे, असे देखील प्रियांका कानूंगो म्हणाल्या.