ETV Bharat / bharat

BIG BREAKING : प्रभाकर साईलच्या आरोपांवर NCB कडून स्पष्टीकरण, समीर वानखेडेंनी आरोप फेटाळले - undefined

Breaking Updates
Breaking Updates
author img

By

Published : Oct 24, 2021, 11:30 AM IST

Updated : Oct 24, 2021, 8:46 PM IST

19:29 October 24

कोयनेत 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप

सातारा -  कोयनेत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.९ नोंदवली गेली आहे. पाटण, कराड, चिपळूणला हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 

16:56 October 24

प्रेमभंगातून तरुणाकडून घरात घुसून प्रेयसीची गळा चिरून हत्या, नांदेडमधील घटना

नांदेड - गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या प्रेम प्रकरणातून एका तरुणाने प्रेमभंग झाल्याच्या कारणावरून घरात घुसुन तरुणीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास शारदानगरातील झेंडा चौक परिसरात घडली. दरम्यान पोलिसांनी आरोपीस घटनास्थळीच ताब्यात घेतले असून सदर घटना प्रेमभंगातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

16:55 October 24

प्रभाकर साईलच्या आरोपांवर NCB कडून स्पष्टीकरण, समीर वानखेडेंनी आरोप फेटाळले

मुंबई - प्रभाकर साईलच्या दाव्यावर एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एनसीबीने प्रसिद्ध पत्रक काढले  आहे.  प्रभाकर साईल यांनी आपले म्हणणे सोशल मीडिया ऐवजी कोर्टात सादर करावेत असे त्यात म्हटले आहे.  आमचे झोन डायरेक्टर समीर वानखडे सदर आरोप फेटाळले असल्याचे म्हटले आहे.. मात्र, तरीही चौकशीची गरज असल्याने एनसीबीचा डायरेक्टर सदर  प्रतिज्ञापत्र चौकशीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती एनसीबीचे मुथा जैन यांनी दिली आहे.

16:18 October 24

खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला

जळगाव - खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप खासदार रक्षा खडसेंना लगावला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याच्या मुद्द्यावरून उठलेल्या वादंगावर पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी हा टोला लगावला आहे. एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्याने असा आरोप केला तर ठीक आहे पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

15:26 October 24

राजकीय फ़ायद्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर, हे आता सिद्ध झाले - काँग्रेस

मुंबई - राजकीय फ़ायद्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे हे आता सिद्ध झाले असून महाराष्ट्राची बदनामी करणारे महाराष्ट्रद्रोही कोण आहेत हे ही उघड़ झाले आहे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. 

14:55 October 24

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणुकीत शरद पवार यांचा विजय

मुंबई - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणुकीत शरद पवार यांचा विजय. पवार यांच्याकडून धनंजय शिंदे यांचा दारुण पराभव. शरद पवार यांना 29 मते तर धनंजय शिंदे यांना अवघी दोन मते मिळाली.

13:47 October 24

  • क्रूज पार्टी प्रकरणी आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थामार्फत 25 कोटी मागितल्याचा गौप्यस्फोट
  • एनसीपीचे अधिकारी समीर वानखडे आणि पंच किरण गोसावी यांच्यावर पंच प्रभाकर साईल यांचे आरोप
  • पंच म्हणून समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, असेही प्रभाकर साईल म्हणाले
  • प्रभाकर साहिल किरण गोसावी यांचा ड्रायव्हर असल्याची प्राथमिक माहिती

11:22 October 24

पुणे - आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान पुण्यातही गोंधळ बघायला मिळाला. येथील काही परीक्षा केंद्रांवर सकाळी 10 वाजून गेल्यावरही विद्यार्थ्यांना पेपर मिळालेला नव्हता. तर काही केंद्रांवर बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती.  

11:20 October 24

नाशिक - आरोग्य विभागाच्यावतीने आज घेण्यात येणाऱ्या भरती पेपर आधीच  गिरणारे केंद्रावर गोंधळ बघायला मिळाला आहे. पेपर केंद्रावर आणताना काळजी घेण्यात आली नाही, त्यामुळे हा गोंधळ झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. 

10:21 October 24

बिग बेक्रिंग

मुंबई - रविवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याआधी बोरिवली येथे यज्ञ केले जाणार आहे. 

Last Updated : Oct 24, 2021, 8:46 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.