ETV Bharat / bharat

Martyr Day 2022 : ना माफी, ना दयेचा अर्ज! भारतामातेसाठी हसत-हसत फासावर - Bhagat Singh Martyr Day

आजच्याच दिवशी सुमारे 90 वर्षांपूर्वी भारतातील महान क्रांतीकारक सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरु यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती. (Martyr Day 2022) या तीघांच्या लोकांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.

क्रांतीकारक राजगुरु भगत सिंह सुखदेव
क्रांतीकारक राजगुरु भगत सिंह सुखदेव
author img

By

Published : Mar 23, 2022, 10:11 AM IST

Updated : Mar 23, 2022, 6:00 PM IST

मुंबई - प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी 'जहाल क्रांतिकारक' अशी भगत सिंग यांची आजही ओळख कायम आहे. (Information about Bhagat Singh) भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलीस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी (23 मार्च 1931)रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.

देशासाठी या तीघांनी हसत हसत बलिदान दिले

या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर त्यावेळी क्रांतीचे समर्थन करणाऱ्या तमाम भारतीयांचे रक्त खवळले. आणि या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली. (Sukhdev and Bhagat Singh, Rajguru) शहीद भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा आज शहिद दिवस आहे. हे तीघे क्रांतीकारी उत्तम द्रष्टे, करुणा बाळगणारे, मानवतावादी असेही होते. देशासाठी या तीघांनी हसत हसत बलिदान दिले.

स्वातंत्र्याचा अर्थ काय होता

भगतसिंग यांचे स्वातंत्र्याबाबतचे विचार अगदी वेगळे होते. इंग्रज देश सोडून जातील तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, असा त्यांचा विश्वास होता. भारत स्वतंत्र तेव्हा होईल जेव्हा हा देश असा समाज बनेल जिथे कोणी कोणाचे शोषण करत नाही. याच विचारांवर ते पुढील लढाईत उतरले होते.

भगतसिंग अवघे १२ वर्षांचे होते

जालियनवाला बाग हत्याकांडाचा भगतसिंग यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. 1919 मध्ये इंग्रजांनी केलेल्या या हत्याकांडाने भगतसिंग यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यावेळी भगतसिंग अवघे १२ वर्षांचे होते. भगतसिंग यांनी जालियनवाला बागेतच ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्याची शपथ घेतली होती, असे म्हटले जाते.

नाटकात अभिनेता म्हणून काम केले

भगत सिंह जीवनात क्रांतिकारी बदल होण्याचे प्रमुख कारण म्हणजे 1921 मध्ये त्यांनी लाहोरमधील 'नर्सरी ऑफ पॅट्रियट्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल कॉलेजमध्ये घेतलेला प्रवेश. हे कॉलेज लाला लजपत राय यांनी सुरू केले होते. या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना भगत सिंह यांनी राणा प्रताप, सम्राट चंद्रगुप्त यांच्या नाटकात अभिनेता म्हणून काम केले. याचा त्यांच्या विचारावर मोठा परिणाम झाला.

9 वर्षात त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून केले

8 एप्रिल 1929 रोजी अटक होण्यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्येक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. गांधीजींनी 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू केली तेव्हा भगतसिंह अवघ्या 13 वर्षांचे होते. 1929 मध्ये त्यांना अटक झाली तेव्हा ते 22 वर्षांचे होते. या 9 वर्षात त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून केलेले कार्य आजही सर्वांच्या स्मरणात आहे.

(24 मे 1931)ला फाशीची तारीख निश्चित करण्यात आली

फासावर जाण्यापूर्वी भगतसिंगांनी जेलच्या काळकोठडीतून आपल्या सहका-यांना पत्र लिहिले होते. 'देश आणि मानवतेसाठी माझ्या मनात जे काही होते त्याचा हजारावा हिस्सा देखील मी पूर्ण करू शकलेलो नाही. जर, आणखी थोडे आयुष्य मिळाले असेत तर, नक्कीच त्या ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता.

आता मोठ्या अधिरतेने शेवटच्या परीक्षेची वाट पाहत आहे

सध्या याशिवाय जगण्याचा कोणताच मोह माझ्या मनात नाही. माझ्यापेक्षा जास्त नशिबवान कोण असू शकतो? आज मला स्वतःचाच अभिमान वाटत आहे. आता मोठ्या अधिरतेने शेवटच्या परीक्षेची वाट पाहत आहे. लाहोर कटात राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह भगतसिंह यांना फाशी देण्यात आली. (24 मे 1931)ला फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, (23 मार्च 1931)ला त्यांना फाशी देण्यात आली.

फाशीवर जाताना त्यांचे आवडते गीत त्यांच्या ओठावर होते

  • कभी वो दिन भी आएगा
  • कि जब आज़ाद हम होंगें
  • ये अपनी ही ज़मीं होगी
  • ये अपना आसमाँ होगा.

23 मार्चचा घटनाक्रम

  • 1880: बसंती देवी, भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्याचा जन्म.
  • 1910: स्वातंत्र्यसैनिक, प्रखर विचारवंत आणि समाजवादी राजकारणी डॉ. राम मनोहर लोहिया यांचा जन्म.
  • 1931: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.
  • 1940: मुस्लिम लीगने पाकिस्तान ठराव मंजूर केला.
  • 1956: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामिक प्रजासत्ताक बनले.
  • 1965: नासाने 'जेमिनी 3' या स्पेस शटलमधून प्रथमच दोन व्यक्तींना अवकाशात पाठवले.
  • 1986: केंद्रीय राखीव पोलीस दलाची पहिली महिला कंपनी दुर्गापूर कॅम्पमध्ये स्थापन झाली.
  • 1987: बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री कंगना राणौतचा जन्म.
  • 1996: तैवानमध्ये पहिली थेट अध्यक्षीय निवडणूक झाली, ज्यामध्ये ली टेंग हुई अध्यक्ष बनली.

हेही वाचा - सिकंदराबाद येथील लाकूड डेपोला भीषण आग; 11 जणांचा मृत्यू

Last Updated : Mar 23, 2022, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.