ETV Bharat / bharat

देशाच्या सुरक्षेवरून तामिळनाडूच्या राज्यपालांची मनमोहन सिंह यांच्यावर टीका; 26/11 दहशतवादी हल्ल्याचे दिले उदाहरण

author img

By

Published : Aug 1, 2022, 12:52 PM IST

भारताच्या 'झिरो टॉलरेन्स टुवर्ड व्हायलेन्स' या भूमिकेचा ( Governor Ravi slams ex PM Manmohan Singh ) पुनरुच्चार करत तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी ( Tamilnadu governor comment on Manmohan Singh ) माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लक्ष्य केले आहे.

governor ravi slams ex PM Manmohan Singh
मनमोहन सिंह धोरण राज्यपाल रवी टीका

कोची (केरळ) - भारताच्या 'झिरो टॉलरेन्स टुवर्ड व्हायलेन्स' या भूमिकेचा ( Governor Ravi slams ex PM Manmohan Singh ) पुनरुच्चार करत तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी ( Tamilnadu governor comment on Manmohan Singh ) माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लक्ष्य केले आहे. 2008 मधील 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर काही महिन्यांत दहशतवादावर पाकिस्तानशी करार केल्याबद्दल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची राज्यपाल रवी यांनी निंदा केली.

हेही वाचा - Student got 151 marks out of 100: विद्यार्थ्याला मिळाले १०० पैकी १५१ गुण, तरीही नापास

रविवारी कोची येथे 'कंटेम्पोररी चॅलेन्जेस टू इंटरनल सेक्युरिटी' या विषयावरील सत्राला संबोधित करताना, तामिळनाडूचे राज्यपाल यांनी मनमोहन सिंह यांच्यावर टीका केली. जेव्हा मुंबईत दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. मूठभर दहशतवाद्यांमुळे देशाचा अपमान झाला होता. हल्ल्याच्या 9 महिन्यांत आमचे तत्कालीन पंतप्रधान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी दोन्ही देश दहशतवादाचे बळी असल्याचे सांगून संयुक्त संभाषणावर स्वाक्षरी केली होती, असा टोमणा राज्यपाल यांनी लगावला.

आपल्याकडे शत्रुबोध आहे का? पाकिस्तान मित्र आहे की शत्रू? हे स्पष्ट व्हायला हवे. जर तुम्ही त्यामध्ये राहण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यात संभ्रम निर्माण होईल, असे म्हणत रवी यांनी थेट त्याकाळच्या काँग्रेस दहशातवादविरोधातील धोरणांवरच टीका केली आहे.

2008 मध्ये 10 लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी (एलईटी) मुंबई गोळीबार आणि बॉम्बस्फोट हल्ले केले होते. यात किमान 174 लोक मारले गेले आणि 300 जखमी झाले होते. या घटनेचा दाखला देत रवी यांनी मनमोहन सिंह यांच्या धोरणांवर टीका केली. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही आमच्या हवाई शक्तीचा वापर करून बालाकोटमध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. जर तुम्ही दहशतवादी कृत्य केले तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल, असा या कारवाई मागचा उद्देश होता, असे राज्यपाल रवी म्हणाले. केंद्रातील भाजप सरकारच्या कामाची काँग्रेसच्या कामाशी त्यांनी तुलना केली.

आत्ताची भारताची आंतरिक सुरक्षा ही मनमोह सिंह यांच्या काळातील सुरक्षेपेक्षा बरी असल्याचेही राज्यपाल रवी म्हणाले. मनमोहन सिंग यांच्या काळात आपल्या अंतर्गत सुरक्षेला माओवादी हिंसाचाराचा मोठा धोका होता. ते मध्य भारतातील 185 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पसरले होते. आणि लोक रेड कॉरिडॉरबद्दल बोलत होते. परिस्थिती चिंताजनक होती. आज त्यांची उपस्थिती 8 पेक्षा कमी जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे, असा दावा देखील राज्यपाल रवी यांनी केला.

काश्मीरवर बोलताना रवी म्हणाले, हिंसेला शून्य सहिष्णुता आहे. ती कठोर वाटू शकते, परंतु जो कोणी बंदुकीचा वापर करतो त्याच्यावर बंदुकीनेच कारवाई केली पाहिजे. देशाच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात बोलणाऱ्यांशी कोणतीही वाटाघाटी केली जात नाहीत. गेल्या 8 वर्षांत कोणत्याही सशस्त्र गटाशी चर्चा केली नाही, असेही राज्यपाल रवी यांनी सांगितले.

हेही वाचा - Leopard made cow its prey: ट्रकच्या हॉर्न-लाईटला न घाबरता बिबट्याने केली गायीची शिकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.