कोलकाता : श्रीलंकेमध्ये सध्या प्रचंड मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीने जनतेनेच विद्रोह केला असून श्रीलंकेच्या अध्यक्षांचे निवासस्थानच संतप्त नागरिकांनी ताब्यात घेतले आहे. या परिस्थितीमुळे श्रीलंकेच्या अध्यक्षांना आपले निवासस्थान सोडून पळ काढावा लागला आहे. श्रीलंकेतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरून भारतातही त्याचे राजकारण सुरू झाले आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार इद्रिस अली ( TMC MLA Idris Ali ) यांनी म्हटले आहे की, श्रीलंकेतील परिस्थितीप्रमाणे एक दिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनाही आपले पद सोडून पळ काढावा लागेल. श्रीलंकेच्या अध्यक्षांची जी स्थिती झाली भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही तीच अवस्था होईल.
पंतप्रधान मोदी पूर्णतः अपयशी - आमदार इद्रिस अली यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी देश सांभाळण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहेत. भारतातील अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होऊ शकते आणि अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींना राजीनामा देऊन पळ काढावा लागेल, असेही इद्रिस अली यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेत जनता संतप्त - श्रीलंकेमध्ये आणिबाणी निर्माण झाली असून मोठ्या आर्थिक संकटात श्रीलंका सापडली आहे. काही महिन्यांपासून श्रीलंकन नागरिक आपल्याच सरकारविरोधात बंड करीत आहेत. श्रीलंकेच्या अध्यक्षांच्या घरावर आंदोलकांनी ताबा घेतला आहे. तर अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांना सर्वकाही सोडून पळ काढावा लागला आहे. 9 जुलैला प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक अध्यक्षांच्या घरावर चाल करून गेले. तथापि, त्याआधीच राष्ट्राध्यक्ष आपल्या घरातून निसटले. त्यानंतर 13 जुलै रोजी राजीनामा देतील अशी घोषणा करण्यात आली.
हेही वाचा - Video : मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल