ETV Bharat / bharat

महाधिवक्ता पदावरून तुषार मेहता यांना काढा; तृणमुलच्या खासदारांची राष्ट्रपतींकडे मागणी

तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या की, आम्ही महाधिवक्ता कार्यालय आणि तुषार मेहता यांच्या चुकीच्या वर्तनावर चिंतेत आहोत. आम्ही चुकीच्या वर्तनाबद्दल तुषार मेहता यांचा तातडीने राजीनामा मागितला आहे.

Mahua Moitra
तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा
author img

By

Published : Jul 5, 2021, 5:42 PM IST

Updated : Jul 5, 2021, 5:58 PM IST

नवी दिल्ली - तृणमुल पक्षाच्या खासदारांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तृणमुल पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीत खासदारांनी तुषार मेहता यांना महाधिवक्ता पदावरून काढण्याची तृणमुल पक्षाने मागणी केली आहे.

तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या की, आम्ही महाधिवक्ता कार्यालय आणि तुषार मेहता यांच्या चुकीच्या वर्तनावर चिंतेत आहोत. आम्ही चुकीच्या वर्तनाबद्दल तुषार मेहता यांचा तातडीने राजीनामा मागितला आहे.

हेही वाचा-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी कात्री न मिळाल्याने थेट हाताने रिबिन तोडली

काय आहे मेहता व अधिकारी भेटीचे प्रकरण-

भाजपचे काही नेते, आमदार आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेत्यांनी १ जुलैला बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तृणमुल पक्षाचे खासदार सुखेंदू शेखर राय म्हणाले, की तुषार मेहता हे सुवेंदु अधिकारी यांची भेट घेऊ शकले नव्हते. त्यासाठी मेहता हे सुवेंदु यांची माफी मागत आहेत. अधिकारी यांना तुषार मेहता यांच्या निवासस्थानी जाण्याची कोणी परवानगी दिली होती? तुषार मेहता यांनी बार काउन्सिलच्या नियम व व्यावसायिक नीतमत्तेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना पदावरून काढायला पाहिजे अशी मोईत्रा यांनी मागणी केली आहे.

हेही वाचा-शक्ती भोग आटा कंपनीकडून ३,२६९ कोटी रुपयांची फसवणूक; ईडीकडून एमडीला अटक

मेहता यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधानांनाही लिहिले पत्र-

मेहता आणि अधिकारी यांची १ जुलैला बैठक झाली होती. त्यावरून तृणमुल पक्षाचे नेते संतप्त झाले आहे. तृणमुल पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून तुषार मेहता यांना पदावरून काढण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा-फादर स्टॅन स्वामी यांचे निधन, २० मिनिटांच्या चौकशीनंतर झाली होती अटक

कशामुळे अधिकारी व मेहता यांच्या भेटीवरून वाद

सुवेंदु अधिकारी यांच्यावर नारदा प्रकरण आणि शारदा चिट फंड घोटाळ्यात सहभाग असल्याचे आरोप आहेत. या दोन्ही खटल्यात प्रभाव टाकण्यासाठी सुवेंदु अधिकारी यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेतल्याचा आरोप तृणमुल पक्षाने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मात्र, हे सर्व आरोप मेहता यांनी फेटाळून लावले आहे. अधिकारी हे कोणतीही माहिती न देता घरी आले होते, असा दावाही महाधिवक्ता तुषार मेहता यांनी केला.

Last Updated : Jul 5, 2021, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.