ETV Bharat / bharat

ममतांवरील हल्ला प्रकरण : तृणमूल आणि भाजपाच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट

भाजपाच्या शिष्टमंडळामध्ये पक्षाचे उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा नीट तपास करण्याची मागणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

TMC & BJP reaction inn attack
ममतांवरील हल्ला प्रकरण : तृणमूल आणि भाजपाच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट
author img

By

Published : Mar 11, 2021, 3:36 PM IST

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आज (गुरुवार) तृणमूल आणि भाजपाच्या शिष्टमंडळाने निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. याप्रकरणी तृणमूलतर्फे खासदार डेरेक ओब्रायन, राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि पार्थ चॅटर्जी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.

यानंतर माध्यमांशी बोलताना डेरेक ओब्रायन म्हणाले, की "९ मार्चला निवडणूक आयोगाने डीजीपींना बदलण्याचे आदेश दिले. दहा मार्चला एका भाजपा नेत्याने 'संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुम्हाला कळेल की काय होणार आहे' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ममतांवर हल्ला झाला. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सत्य लवकरात लवकर बाहेर यावे अशी आमची मागणी आहे."

ममतांवरील हल्ला प्रकरण : तृणमूल आणि भाजपाच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट

"या निंदनीय प्रकाराला जबाबदार व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी. ही घटना घडल्यानंतर केवळ अर्ध्या तासातच विविध प्रकारची वक्तव्ये समोर येऊ लागली होती. अशा वक्तव्यांचा आणि आरोपांचाही आम्ही निषेध करतो. या हल्ल्याबाबत कोणाला शंका असल्यास त्यांनी डॉक्टरांशी बोलून घ्यावे" असेही ओब्रायन पुढे म्हणाले.

भाजपाच्या नेत्यांनीही घेतली निवडणुक आयोगाची भेट..

भाजपाच्या शिष्टमंडळामध्ये पक्षाचे उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा नीट तपास करण्याची मागणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

ममतांवरील हल्ला प्रकरण : तृणमूल आणि भाजपाच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट

"तृणमूल या दुर्घटनेचे राजकारण करत आहे. अशा घटनांचा वापर राजकारणासाठी करण्यात येऊ नये" असे मत कैलास विजयवर्गीय यांनी यावेळी व्यक्त केले. "या घटनेचा व्हिडिओ हा सर्व लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात यावा, जेणेकरुन सर्वांना कळेल की यावेळी नेमकं काय झालं" अशी मागणी भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने केली.

हेही वाचा : दीदींच्या पायाला आणि खाद्यांला दुखापत, कोलकाताच्या रुग्णालयात उपचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.