ETV Bharat / bharat

Chandrayaan 3 च्या लॅंडिंगसाठी अवघे काही तास बाकी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं - भारताच्या चंद्र मोहिमेची टाइमलाइन

चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लॅंडिंगची वेळ आता अगदी जवळ येवून ठेपली आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उपस्थिती नोंदवणारा भारत जगातील पहिला देश ठरेल. चला तर मग, जाणून घेऊया इस्रोच्या या ऐतिहासिक मिशनची संपूर्ण टाइमलाइन... (Chandrayaan 3)

Chandrayaan 3
चंद्रयान 3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 3:38 PM IST

नवी दिल्ली : 140 कोटी भारतीय बहुप्रतीक्षित चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगची वाट पाहत आहेत. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी देशभरातील लोक देवाकडे प्रार्थना करत आहेत. बुधवारी, संध्याकाळी 05:45 वाजता विक्रम लँडरचे पॉवर्ड लँडिंग अपेक्षित आहे. सध्या मिशन शेड्यूलवर असून सिस्टमची नियमित तपासणी केली जात आहे.

चंद्रयान 3 खरे तर 41 दिवसांपूर्वी लॉन्च झाले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत काय काय घडले हे थोडक्यात जाणून घेऊया.

  • 11 जुलै 2023 - चंद्रयान 3 च्या प्रक्षेपणाची संपूर्ण तयारी आणि 24 तास चाललेली तालीम पूर्ण झाली.
  • 14 जुलै - चंद्रयान 3 भारतीय वेळेनुसार दुपारी 2.35 वाजता GSLV मार्क 3 (LVM 3) हेवी-लिफ्ट प्रक्षेपण वाहनातून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च झाले.
  • 15 जुलै - पहिल्या टप्प्यात, अंतराळ यान चंद्राच्या 41762 किमी x 173 किमी कक्षेत स्थापित झाले.
  • 17 जुलै - त्यानंतर, अंतराळ यानाला 41603 किमी x 226 किमी कक्षेत स्थापित करण्यात आले.
  • 22 जुलै - तिसऱ्या टप्प्यात, यानाला 71351 किमी x 233 किमी कक्षेत ठेवण्यात आले.
  • 1 ऑगस्ट - चंद्रयान 3 ने चंद्राच्या प्रभाव क्षेत्रात प्रवेश केला. यानाला 288 किमी x 369328 किमी कक्षेत ठेवण्यात आले.
  • 5 ऑगस्ट - चंद्रयान 3 ने 164 किमी x 18074 किमीची कक्षा यशस्वीरित्या गाठली.
  • 9 ऑगस्ट - चंद्रयानाची कक्षा 174 किमी x 1437 किमी इतकी कमी करण्यात आली.
  • 14 ऑगस्ट - चंद्रयानाने कक्षेच्या वर्तुळाकार टप्प्यात प्रवेश केला. अंतराळ यानाने 151 किमी x 179 किमीच्या गोलाकार कक्षेत प्रवेश केला.
  • 16 ऑगस्ट - यानाने 153 किमी x 163 किमीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राच्या सीमेवर पोहोचले.
  • 17 ऑगस्ट - स्वतंत्र प्रवास सुरू करण्यासाठी लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाले.
  • 19 ऑगस्ट - लँडर मॉड्यूलचे यशस्वी डीबूस्टिंग ऑपरेशन झाले. त्याची कक्षा 113 किमी x 157 किमी पर्यंत कमी केली गेली.
  • 20 ऑगस्ट - दुसऱ्या आणि शेवटच्या डीबूस्टिंग ऑपरेशनने लँडर मॉड्यूल ऑर्बिट 25 किमी x 134 किमी पर्यंत कमी केले.
  • 21 ऑगस्ट - चंद्रयान 2 ने, चंद्रयान 3 चे कक्षेत स्वागत केले. दोघांमध्ये संपर्क प्रस्थापित झाला.
  • 22 ऑगस्ट - इस्रोने चंद्रयान 3 मोहिमेच्या लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) ने सुमारे 70 किमी उंचीवरून टिपलेल्या चंद्राच्या प्रतिमा प्रसिद्ध केल्या. यंत्रणांची नियमित तपासणी झाली. सर्व काही सुरळीत होते.
  • 23 ऑगस्ट - चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3 च्या लँडर मॉड्यूलचे सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग संध्याकाळी 6.04 वाजता अपेक्षित आहे.

हेही वाचा :

  1. Chandrayaan 3 : नियोजित वेळेनुसारच होणार चंद्रयान 3 मोहिमेचं लँडींग, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी फेटाळली 'प्लॅन बी'ची शक्यता
  2. Chandrayaan 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतून होणार चंद्रयान 3 चे साक्षीदार, असं पाहणार चंद्रयानाचं 'लँडींग'
  3. चांद्रयानासाठी शेवटची १५ मिनिटे धोक्याची, जाणून घ्या २०१९ मध्ये काय झाले होते?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.