ETV Bharat / bharat

'2021 टाइम 100 नेक्स्ट' यादीत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझादांचा समावेश

author img

By

Published : Feb 18, 2021, 7:49 PM IST

'2021 टाइम 100 नेक्स्ट' ची यादी बुधवारी प्रसिद्ध झाली असून या यादीमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना स्थान मिळाले आहे.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर

नवी दिल्ली - येत्या काळात बदल घडवून आणणाऱ्या उगवत्या 100 युवा नेत्यांच्या यादीमध्ये भारतातील आणि भारतीय वंशाच्या अशा पाच व्यक्तींना स्थान मिळाले आहे. '2021 टाइम 100 नेक्स्ट' ची यादी बुधवारी प्रसिद्ध केली. यात भविष्यकाळ घडविणारे 100 उदयोन्मुख नेते समाविष्ट आहेत.

नव्या यादीत भविष्यात इतिहास घडवण्याची क्षमता असणाऱ्या जगभरातली उद्योन्मुख नेतृत्वांचा सामावेश करण्यात आला आहे. भारतातील भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे. भारतीय वंशाचे इंस्टाकार्टचे संस्थापक अपूर्व मेहता, गेट अस पीपीआई या ना-नफा संस्थेचे कार्यकारी संचालक शिखा गुप्ता आणि 'नॉन-प्रॉफिट 'अपसोल्व'चे रोहन पावलुरी यांचा समावेश आहे. तसेच ट्विटरचे वकील विजया गड्डे आणि ब्रिटेनचे वित्त मंत्री ऋषि सुनक यांचाही समावेश आहे.

यादीतील प्रत्येकजण इतिहास घडविण्यासाठी तयार आहे. खरं तर, अनेकांनी यापूर्वीच इतिहास घडविला आहे, असे 'टाइम 100' चे संपादकीय दिग्दर्शक डॅन म्हणाले.

उत्तर प्रदेशमधील हाथरस पीडितेला न्याय मिळावा, यासाठी आझाद यांनी मोहीम सुरू केली होती. तसेच दलित समुदायाला शिक्षणाच्या देण्यासाठी ते शाळा चालवतात. जाती-आधारित हिंसाचाराला बळी पडलेल्या लोकांच्या हक्कासाठीही ते लढतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.