गाझियाबाद : रेल्वे ट्रॅकजवळ ( Railway Track In Ghaziabad ) व्हिडिओ बनवताना एक महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही रेल्वे रुळावर उभे राहून व्हिडिओ बनवत होते. यादरम्यान या लोकांना ट्रेन दिसली नाही, त्यामुळे त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. ( Three People Died After Being Hit By Train )
रेल्वे ट्रॅकवर तीन जणांचा मृत्यू : प्रकरण गाझियाबादच्या मसुरी भागातील आहे जिथे बुधवारी रात्री पोलिसांना मसुरीमध्ये रेल्वे ट्रॅकवर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी ट्रेनच्या लोको पायलटकडून माहिती घेतली असता, महिला आणि दोघेही रेल्वे ट्रॅकवर उभे असताना व्हिडिओ बनवत असल्याचे दिसून आले. तिघेही व्हिडीओ बनवण्यात इतके व्यस्त होते की त्यांना ट्रेन आल्याचेही कळले नाही. त्यामुळे तिघेही ट्रेनला धडकले, त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मृतांची ओळख पटलेली नाही : पोलिसांना घटनास्थळावरून मृतांचे मोबाईलही सापडले असून ते तुटलेले आहेत. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी काही प्रत्यक्षदर्शींशीही चर्चा केली असून, त्यात हे तिघेही रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओ बनवताना दिसल्याचे समोर आले आहे. लोकांचा दावा आहे की हे लोक सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवत होते. याआधीही अशी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये लोक व्हिडिओ बनवताना सेल्फी काढण्यात काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि अपघाताला बळी पडतात. यासाठी रेल्वेने अनेकदा सूचना जारी करून लोकांना रेल्वे ट्रॅकजवळ सतर्क राहण्यास सांगितले आहे. असे असतानाही अशा घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत.