ETV Bharat / bharat

Operation Sarhad : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे तिघे अटकेत - ऑपरेशन सरहद

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना ( Pakistans intelligence agencies ) महत्त्वाची माहिती पाठवणाऱ्या तीन पाकिस्तानी हेरांना ( Three Pakistani Spies ) ‘ऑपरेशन सरहद’ ( Operation Sarhad ) या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या ऑपरेशनअंतर्गत पकडण्यात आले आहे. त्या तिघांचीही पोलीसांकडून सध्या चौकशी सुरू ( Police Investigating Three Epies )आहे. गंगानगर, हनुमानगड आणि चुरू जिल्ह्यातून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Operation Sarhad
ऑपरेशन सरहद
author img

By

Published : Jul 3, 2022, 10:16 AM IST

चुरू ( राजस्थान ) - पाकिस्तानची गुप्तचर संस्था ( Pakistans intelligence agencies ) आता भारतात त्यांचे स्थानिक एजंट तयार करून देशाच्या सुरक्षेला छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रकार राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातूनसमोर आला आहे. गुप्तचर यंत्रणेने राबविलेल्या ऑपरेशन सरहदमध्ये गंगानगर, हनुमानगड आणि चुरू जिल्ह्यात एकूण 23 संशयित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. यादरम्यान, तिथले तीन व्यक्ती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या सतत संपर्कात ( Three Pakistani Spies ) होते. हे निष्पण्ण झाले. हे तिघेही पाकिस्तानी एजन्सीला महत्त्वाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत होते. त्या बदल्यात तिघांना मोबदलाही मिळत होता.

व्यक्तींना स्थानिक एजंट बनवले - पोलीस महासंचालक गुप्तचर उमेश मिश्रा ( Director General of Police Intelligence Umesh Mishra ) यांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था भारतीय नागरिक आणि महत्त्वाच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना स्थानिक एजंट बनवतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधतात आणि त्यांना फूस लावून आपल्या बाजूने बळवून घेतात. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्थांकडून अशा कारवायांवर राज्याच्या विशेष शाखेकडून लक्ष ठेवले जात आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सीमावर्ती भागात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

ऑपरेशन सरहद - डिसेंबर 2012 मध्ये 21 ते 24 तारखेपर्यंत गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात ऑपरेशन सरहद ( Operation Sarhad ) राबवण्यात आले. तर 1 ते 4 मार्च 2022 या काळात जोधपूर, बारमेर आणि जैसलमेर जिल्ह्यात ऑपरेशन सरहद राबवण्यात आले. त्याच वेळी, 25 ते 28 जून 2022 या काळात, श्रीगंगानगर, हनुमानगड आणि चुरू जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन सरहद राबवले गेले. या कारवाई अंतर्गत, राज्य विशेष शाखा जयपूर आणि सीआयडी पथकाने २३ संशयित व्यक्तींची चौकशी केली.

पाकिस्तानी संस्थांच्या संपर्कात - हनुमानगढ येथील अब्दुल सत्तार हा 2010 पासून नियमितपणे पाकिस्तानमध्ये जात होता. पाक गुप्तचर संस्थेचा स्थानिक एजंट म्हणून काम करत होता. हे सर्व त्याने चौकशीदरम्यान, कबूल केले आहे. पाकिस्तान भेटीदरम्यान, त्याला भारतातील घडामोडींची महत्त्वाची माहिती देण्यासाठी पाक गुप्तचर संस्था प्रवृत्त करत होत्या. त्यामुळे भारतात आल्यानंतर तो सतत पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात होता. तो सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो शेअर करत होता.

गुन्ह्यांची कबूली - सुरतगड चुरू येथील रहिवासी नितीन यादव हा कॅन्टोन्मेंट परिसरात फळे, भाजीपाला पुरवण्याचे काम करतो. त्या भागात सतत हालचाली सुरू असतात. त्यामुळे चौकशीदरम्यान यादवने महत्त्वाची माहिती शेअर केल्याचे आणि पाकिस्तानी महिला एजंटच्या हनीट्रॅपमध्ये अडकून हे कृत्य केल्याचे कबूल केले. तर, बाडमेरचा रहिवासी असलेला विकास ट्रेडर्स नावाच्या कारखान्यात काम करणारा राम सिंह याने चौकशीत आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या बॉर्डर आऊट पोस्ट आणि सीमावर्ती भागाचे फोटो, व्हिडिओ पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेसोबत शेअर करून पैसे मिळवल्याचे कबूल केले.

हेही वाचा - Madhya Pradesh : संतापजनक.. सरपंच म्हणून निवडून येताच समर्थकांनी दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.