ETV Bharat / bharat

हवाई दलाच्या ताकदीत भर, आणखी तीन राफेल भारतात दाखल

आत्तापर्यंत भारताला फ्रान्सकडून ११ राफेल विमाने मिळाल्याची माहिती हवाई दलाने दिली. भारतीय विमानतळावर राफेल उतरताच ट्विट करून हवाई दलाने माहिती दिली. सात हजार किलोमीटर अंतर पार करून राफेल भारतात पोहचले.

राफेल
राफेल
author img

By

Published : Jan 28, 2021, 2:13 PM IST

नवी दिल्ली - फ्रान्सकडून आणखी तीन राफेल लढाऊ विमाने भारताला देण्यात आली आहेत. लडाखमध्ये चीनसोबत सीमावाद सुरू असतानाच राफेल विमाने भारतात दाखल झाल्याने देशाची संरक्षण सज्जता वाढली आहे. फ्रान्सकडून याआधी भारताला मिळालेली राफेल विमाने देशाच्या उत्तरेकडील हवाई दलाच्या तळावर तैनात करण्यात आली आहेत.

आत्तापर्यंत ११ विमाने भारताला मिळाले -

आत्तापर्यंत भारताला फ्रान्सकडून ११ राफेल विमाने मिळाल्याची माहिती हवाई दलाने दिली. भारतीय विमानतळावर राफेल उतरताच ट्विट करून हवाई दलाने माहिती दिली. सात हजार किलोमीटर अंतर पार करून राफेल भारतात पोहचले. राफेल विमानांची पहिली खेप भारताला २९ जुलै २०२० ला मिळाली होती.

एकूण ३६ विमानांची ऑर्डर -

३६ अत्याधुनिक राफेल विमाने खरेदी करण्याचा करार भारताने फ्रान्स सरकारसोबत केला आहे. फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून राफेल विमानांची निर्मिती करण्यात येत आहे. हा व्यवहार एकूण ५९ हजार कोटींचा आहे. आत्तापर्यंत ११ विमाने भारताला मिळाली आहे. राफेल व्यवहारावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्वाळा दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.