नवी दिल्ली 9 मार्च रोजी झालेल्या अपघाती ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या Brahmos Missile Misfire उच्चस्तरीय चौकशीत जबाबदार धरण्यात आलेल्या हवाई दलाच्या तीन अधिकाऱ्यांना संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी काढून Three IAF officers sacked टाकले. चुकून हे क्षेपणास्त्र पाकिस्तानात डागले गेले BrahMos missile misfire over Pakistan होते. या घटनेची चौकशी करणार्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीत असे आढळून आले की, तीन अधिकाऱ्यांनी मानक कार्यप्रणालीचे पालन केले नाही. त्या घटनेनंतर संरक्षण मंत्रालयाने खेद व्यक्त केला होता.
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 9 मार्च रोजी ब्रह्मोस क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आले. घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासह प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी न्यायालयाला असे आढळून आले की, तीन अधिकाऱ्यांनी मानक कार्यपद्धतीचे पालन केले नाही. निवेदनानुसार, या तीन अधिकाऱ्यांना या घटनेसाठी प्रामुख्याने जबाबदार धरण्यात आले आहे. केंद्र सरकारने तत्काळ प्रभावाने त्यांची सेवा समाप्त केली आहे. या अधिकाऱ्यांना बडतर्फीचे आदेश २३ ऑगस्ट रोजी देण्यात आले आहेत.
9 मार्च 2022 रोजी ब्रह्मोस क्षेपणास्त्र चुकून डागले गेले ACCIDENTALLY FIRING BRAHMOS MISSILE आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत पडले. मात्र, त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. या घटनेनंतर लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले होते. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या आकस्मिक झालेल्या घटनेत तीन अधिकाऱ्यांनी मानक कार्यप्रणालीचे पालन केले नसल्याचे आढळून आले. IAF SACKS THREE OFFICERS FOR ACCIDENTALLY FIRING BRAHMOS MISSILE
हेही वाचा BrahMos Misfire चुकून भारताचे मिसाईल पडले पाकिस्तानात जाऊन