ETV Bharat / bharat

Gehlot government गेहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांचा राजीनामा- काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांची माहिती

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय माकन हे शुक्रवारी सायंकाळी जयपूरला पोहोचले. त्यांना विमानतळावर भेटण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) आणि राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासराही हेदेखील पोहोचले होते.

गेहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांचा राजीनामा

author img

By

Published : Nov 19, 2021, 9:24 PM IST

जयपूर - राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. कारण, गेहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

जयपूरमध्ये पोहोचल्यानंतर अजय माकन (Ajay Maken) यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते माकन म्हणाले, की आरोग्य मंत्री रघु शर्मा (Raghu Sharma), शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा (Govind Singh Dotasara) आणि महसूल मंत्री हरीश चौधरी (Harish Choudhary) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शविणारे पत्र ( Rajasthan three cabinet ministers resigned) लिहिले आहे. हे पत्र राजीनामा मानले जात आहे. या नेत्यांना काँग्रेसने नवीन जबाबदारी सोपविली आहे.

अजय माकन यांच्या स्पष्टीकरणामुळे अशोक गेहलोत यांना मंत्रिमंडळाचा विस्तार (Gehlot cabinet reorganization) करावा लागणार आहे.

हेही वाचा-VIDEO : आंध्रप्रदेशमध्ये मुसळधार....; तिरुमलामध्ये भूस्खलन तर चित्तूर जिल्ह्यात चार महिल्या गेल्या वाहून

हेही वाचा-आंध्र प्रदेश : अन् चंद्राबाबू नायडू ढसाढसा रडले; जाणून घ्या कारण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.