ETV Bharat / bharat

JK Encounter : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले 3 जवानांना वीरमरण, कुलगाममध्ये शोधमोहीम सुरु

जम्मू काश्मीरमधील कुलगाममधील हालनच्या जंगलात झालेल्या चकमकीत तीन सुरक्षा दलाच्या जवानांना वीरमरण आले आहे. हे तीन जवान हालन येथील जंगलात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चमकमकीत जखमी झाले होते. या जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू होते.

JK Encounter
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 5, 2023, 9:01 AM IST

Updated : Aug 5, 2023, 12:57 PM IST

जम्मू : दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान जखमी झाल्याची घटना कुलगाममधील हालनच्या जंगलात घडली होती. या जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरू असताना या जवानांना वीरमरण आले आहे. हालनच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत असून अद्यापही शोधमोहीम सुरु असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान जखमी : कुलगाममधील हालनच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. या माहितीवरुन सुरक्षा दलाच्या जवानांनी हालनच्या जंगलात शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले होते. या जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी तीन जवान हुतात्मा : दहशतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले होते. या जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांना वीरमरण आले आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या वतीने याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हालनच्या जंगलात दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरुच आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना सगळीकडून घेरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लष्कर-ए-तोयबाच्या तीन हस्तकांना पकडले : जम्मू काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी लष्कर ए तोयबाशी संबंधित असलेल्या टीआरएफच्या तीन हस्तकांना पकडल्याची माहिती दिली. या हस्तकांना श्रीनगरच्या नातीपोरा परिसरातून पकडण्यात आले आहे. श्रीनगरच्या नातीपोरा परिसरात जम्मू काश्मीर पोलिसांनी पकडलेल्या या हस्तकांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली.

हेही वाचा -

  1. JK Kupwara Encounter : कुपवाडामध्ये पाच विदेशी दहशतवाद्यांना धाडले यमसदनी; लष्करी जवानांकडून शोधमोहीम सुरूच
  2. Manipur Violence : मणिपुरात हिंसाचार सुरुच, कुकी अतिरेक्यांनी केली दोघांसह रिलीफ कॅम्पमधील विद्यार्थ्याची हत्या
  3. Jammu Kashmir Encounter : काश्मीरमध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन जवान जखमी

Last Updated : Aug 5, 2023, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.