उत्तराखंड (देहरादून) - देशातील वाघांचा सर्वात सुरक्षित किल्ला असलेल्या कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये वन्यजीव तस्करांकडून सध्या घुसखोरी केली जात आहे. वाघांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले कॅमेरे केवळ चोरीच होत नाहीत तर जाळुन नष्ट करण्यात येत आहेत. ईटीव्ही भारतने वन्यजीव तस्करांच्या कॉर्बेटमध्ये घुसखोरीचा काही पुराव्यांचा खुलासा करीत आहे.
ही बातमी चिंताजनक आहे. कारण कॉर्बेट अशी जागा आहे. जेथे वाघ सहजपणे वावरतांना दिसतात. त्यामुळे वाघांची शिकार करणे वन्यजीव तस्करांना कॉर्बेटला पोहोचल्यावर अवघड काम नाही.
कॉर्बेट नॅशनल पार्कमधून 5 कॅमेरे चोरीला-
आरटीआयकडून ईटीव्ही भारतला मिळालेल्या माहितीत विभागाने मान्य केले आहे, की कॉर्बेट नॅशनल पार्कमधून 5 कॅमेरे चोरीला गेले आहेत. तसेच वन्यजीव तस्करांनी 2 कॅमेरे नष्ट केले आहेत. यापूर्वी ईटीव्ही भारतने राजाजी नॅशनल पार्कमध्ये कॅमेऱ्यांची चोरी झाल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर यासंदर्भात चौकशीही करण्यात आली होती.
अशा प्रकरणांची चौकशी सुरू-
वनमंत्री हरक सिंग रावत यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता ते म्हणाले की, ही बाब त्यांच्या लक्षात आहे. ते याबाबत माहिती गोळा करीत आहेत. तसेच अशा प्रकरणांची चौकशी सुरू आहे. विभागात वन कर्मचार्यांची कमतरता आहे, त्यामुळे या सर्व बाबींवर देखरेख करण्यात काही अडचण असल्याचे हरक सिंग रावत म्हणाले.
हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष: '2020' सरकारच्या योजनांचा आणि आरोग्याबाबत निर्णयांचा आढावा