हैदराबाद - देशभरात दिवाळीची धामधूम सुरू आहे. मात्र मिठाईशिवाय या सणाचा आनंद अपूर्ण आहे. सध्या मिठाईच्या दुकानांमध्ये सजवण्यात आलेल्या वेगवगेळ्या प्रकारच्या रंगबेरंगी मिठाई कोणाच्याही तोंडाला पाणी आणू शकतात. या मिठाईंची किंमत वेगवेगळी असते. सरासरी 300 ते 400 रुपये प्रति किलोपासून सुरू होणाऱ्या मिठाईंचे दर सामान्यपणे एक हजार ते दोन हजार प्रतिकिलोपर्यंत पोहेचतात. काजू कतली, पिस्ता, केसर सह सुक्या मेव्यापासून बनवलेल्या मिठाईचे दर या पातळीवर पोहचतात. मात्र आपण अशा मिठाईबद्दल जाणून घेऊया ज्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक महिन्याचा पगारही कमी पडू शकतो.
छप्पन भोगचे एग्जॉटिका - 50,000 रु./किलो -
लखनौचा छप्पन भोग देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. येथे देशातील सर्वात महागडी मिठाई मिळते. या मिठाईला एग्जॉटिका म्हटले जाते, 1 किलो एग्जॉटिका मिठाईसाठी तुम्हाला 50 हजार रुपये खर्च करावे लागतील. ही मिठाई बनवण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर केला जातो त्या वस्तू जगातील वेगवेगऴ्या देशातून मागवल्या जातात. ही मिठाई बनवण्यासाठी अमेरिकेतून ब्लूबेरिज, साउथ आफ्रिका व ऑस्ट्रेलियातून मॅकाडेमिया नट्स आणि यूरोपीय देशांतून हेजलनट्स मागवले जाते. त्याचबरोबर पाइन नट्स, केसर आणि बदामाचाही वापर केला जातो.
आग्र्याची 30,000 रुपये किलो किंमतीची मिठाई -
आग्र्याचा पेठा तुम्हा ऐकला असेल, पण दिवाळीत आग्र्याच्या एका दुकानात 30 हजार रुपये किलो किंमतीची मिठाई विकली जात आहे. या मिठाईला सुखा मेवा व सोन्याच्या वर्कपासून तयार केले आहे. मिठाईच्या एका तुकड्याची किंमत 751 रुपये आहे तर एक किलो मिठाईसाठी 30,000 रुपये द्यावे लागतील.
गोल्डन पिस्ता बॉल-नोजा पिस्ता डिलाइट- 25,000 रु./किलो
गुजरातमध्ये गोल्डन पिस्ता बॉल (Golden Pistachio Ball) आणि गोल्डन पिस्ता डिलाइट (Noja Pistachio Delight) नावाची मिठाई 25 हजार रुपये किलो दराने विकली जात आहे. अहमदाबादच्या मिठाई दुकानात विक्री होत असलेल्या या मिठाईमध्ये गोल्डन फॉयल आणि 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. मिठाईत सर्वात महागड्या सुख्या मेव्यासह अन्य प्रकारच्या ड्राय फ्रूट्सचा वापर करण्यात आला आहे. हे ड्राय फ्रुट इराण, इराक व अफगानिस्तानमधून येतात.
गोल्ड प्लेटर- 16,800 रु./किलो
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गोल्ड प्लेटर नावाची एक मिठाई 4200 रुपये पाव म्हणजे 250 ग्रामच्या दराने विकली जात आहे. या प्रकारे याचे किंमत 16,800 रुपये प्रतिकिलो आहे. मिठाई विक्रेत्याने सांगितले की, या मिठाईला बनवण्यासाठी पिशोरी पिस्ताबरोबरच काजू, बदाम आणि केसरचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर वरून सोन्याचा वर्क लावण्यात आला आहे. या मिठाईचे पॅकिंगही लोकांना आकर्षित करत आहे.
सुवर्ण मिठाई- 15,000 रु./किलो
महाराष्ट्रातील ठाण्यात एक मिठाईचे दुकान सुवर्ण मिठाईमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. या मिठाईची किंमत 15 हजार रुपये किलो आहे. मिठाईची पॅकिंगही खास करण्यात आले आहे. एका बॉक्समध्ये मिठाईचे केवळ सहा पीस आहेत. अर्धा किलोमध्ये 18 पीस मिळतात तर यासाठी तुम्हाला 7500 रुपये द्यावे लागतील. एक किलोमध्ये मिठाईचे 46 पीस मिळतील त्यासाठी 15000 रुपये खर्च करावे लागतील. ही मिठाई बदाम, पिस्ता यापासून बनवली आहे व यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
सुवर्ण कलश- 11,000 रु./किलो
महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये सुवर्ण कलश नावाची एक मिठाई चर्चेत आहे. याची किंमत 11 हजार रुपये प्रति किलोग्राम आहे. ही मिठाई काजू, केसर, पिस्ता, बादाम यासारख्या ड्राय फ्रूट्सने तयार केली आहे. या मिठाईवर 24 कॅरेट सोन्याचा वर्क चढवला आहे. मिठाई विक्रेत्याने सांगितले की, या मिठाईला बनवण्यासाठी कारागिरांना राजस्थानमधून बोलावण्यात आले होते. ही मिठाई खरेदी केल्यानंतर प्रमाणपत्रही देण्यात येते. त्यामध्ये दावा करण्यात येतो की या मिठाईत शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
गोल्ड घारी- 9000 रु./किलो
महागड्या मिठाईच्या यादीत सूरतची खास मिठाई गोल्ड घारी (Gold Ghari) ही सामील आहे. शरद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये चंदनी पडवा हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी घारी मिठाई खाण्याची परंपरा आहे. मावा, साखर, देशी तूप व ड्राय फ्रूट्सपासून बनवलेल्या या मिठाईवर चांदीचा वर्क चढवले जाते. मात्र सुरतच्या मिठाई दुकानात सोन्याचा वर्क लावलेल्या गोल्ड घारी मिठाईची कीमत 9,000 रुपये प्रतिकिलो आहे.
कोहिनूर गोल्ड हलवा- 4000 रु./किलो
सणासुदीच्या काळात खीर व हलवा तयार करणे सामान्य गोष्ट आहे. मात्र लखनौ शहरातील रहमत अली स्वीट्स कॉर्नरवर मिळणाऱ्या कोहिनूर गोल्ड हलव्याचा स्वाद चाखण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशावर नजर टाकावी लागेल. कारण येथे मिळणारा हलवा 4000 रुपये प्रति किलो दराने मिळतो. हा हलवा तयार करण्यासाठी सूखा मेवा व दूधाचा वापर केला जातो. त्यानंतर सोने व चांदीचा वर्क चढवला जातो.
सर्वात महागडा लाडू -
विवाह समारंभ व सणासुदीच्या काळात तोंड गोड करण्यासाठी लोकांची पहिली पसंत असते लाडू. लाडू एक अशी मिठाई असते जी स्वादमध्ये चांगली व अन्य मिठाईच्या तुलनेत स्वस्त असते. मात्र तुम्हाला माहिती आहे की, सर्वात महागडा लाडू कितीला मिळतो.
आतापर्यंत सर्वात महागड्या लाडूची किंमत 18.90 लाख रुपये आहे. हैदराबादमध्ये गणेश उत्सव खूपच उत्साहाने साजरा केला जातो. येथील बालापूरमध्ये प्रतिवर्ष गणेश लाडूचा लिलाव केला जातो. यावर्षी 21 किलो गणेश लाडू 18.90 लाख रुपयात लिलाव झाला. आंध्र प्रदेशच्या एमएलसी रमेश यादव आणि मैरी शशांक रेड्डी यांनी ही बोली जिंकली. ही परंपरा 1980 पासून सुरू आहे. पहिली बोली 450 रुपयांना लागली होती.
1200 रुपयांची बाहुबली गुजिया -
लखनौमधील छप्पन भोग मध्ये होळीच्या वेळी बाहुबली गुजिया मिळते. एका गुजियाचे वजन जवळपास दीड किलो व लांबी जवळपास 14 इंच असते. एका गुजियाची किंमत 1200 रुपये असते. ही तयार करण्यासाठी खवा, केसर, बदाम, पिस्ता व साखरेचा वापर केला जातो. एक गुजिया तळण्यासाठी जवळपास 20 ते 30 मिनिटे लागतात.
जगातील सर्वात महागडी मिठाई -
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सर्वात महागडी मिठाई बनवली जाते. या मिठाईची किंमत 25 हजार अमेरिकी डॉलर म्हणजे 18.5 लाख रुपये आहे. केवळ एक कपडेजर्ट म्हणजे मिठाईची किंमत 18.5 लाख रुपये आहे. ही किंमत एका लग्जरी कारच्या किंमतीबरोबर आहे.
या मिठाईला क्रिस्टलच्या भांड्यात ठेवले जाते. 28 प्रकारच्या प्रीमियम चॉकलेटच्या मिश्रणातून बनवलेल्या या स्वीट डिशला ज्या क्रिस्टलच्या भांड्यात ठेवले जाते ते सोन्याचे असते. त्याच्या खाली हिऱ्यांचे ब्रेसलेट लावून सजवले जाते. त्यामध्ये 18 कॅरेटचा हिरा जोडला जातो. मिठाई खाल्यानंतर तुम्ही हे क्रिस्टल गेऊन जाऊ शकता. सर्वात महागडे डेसर्ट असल्याने याची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्येही झाली आहे.