त्रिवेंद्रम (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्याबाबत राज्य पोलिसांकडून सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे. एडीजीपी इंटेलिजन्सने तयार केलेला सुरक्षा आराखडा लीक झाला आहे. सुरक्षा प्रभारी अधिकाऱ्यांचे तपशीलही बाहेर आले आहेत.यामध्ये 49 पानांच्या या अहवालात व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत सर्वसमावेशक माहिती आहे. पंतप्रधान ज्या जिल्ह्यांना भेट देतील त्या जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनाच ते सुपूर्द करण्यात आले. एडीजीपी इंटेलिजन्स विनोद कुमार यांनी या संदर्भात तपास सुरू केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिलपर्यंत दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर : केरळ पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्राचा तपास तीव्र केला आहे. भाजप प्रदेश समिती कार्यालयात पोहोचलेल्या पत्रात पंतप्रधानांच्या केरळ दौऱ्यात आत्मघाती हल्ले होतील, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिलपर्यंत दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. एर्नाकुलम येथील रहिवासी असलेल्या जोसेफ जॉन नादुमुत्ताथिल याच्या नावाने हे धमकीचे पत्र आले आहे.
वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार : आठवडाभरापूर्वी भाजप प्रदेश कमिटीच्या कार्यालयात हे पत्र प्राप्त झाले असून, त्यांनी ते केरळ पोलीस प्रमुखांना दिल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी त्याचा तपास सुरू केला आहे. मात्र, ही बाब आज सकाळी उघडकीस आली. वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासह इतर अनेक कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.
'युवम' या संमेलनाचे उद्घाटन : पंतप्रधान मोदी २४ तारखेला संध्याकाळी ५ वाजता कोची नौदल विमानतळावर पोहोचणार आहेत. त्यांचा मध्य प्रदेशातून हवाई दलाच्या विशेष विमानाने येण्याचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी 5.30 पर्यंत ते भाजपच्या रोड शोमध्ये सामील होतील. त्यानंतर ते थेवरा सेक्रेड हार्ट कॉलेज मैदानावर भाजपच्या नेतृत्वाखालील युवा संघटनांनी आयोजित केलेल्या 'युवम' या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.
हेही वाचा : Rahul Gandhi left Bungalow: राहुल गांधींनी सरकारी बंगला सोडला! म्हणाले, मी सत्य बोलत असल्यामुळेच...