तिरुअनंतपुरम - केरळमध्ये रविवारी एक लग्न झाले, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. (The youngest mayor Arya Rajendran) देशातील सर्वात तरुण महापौर आर्य राजेंद्रन यांनी केरळचे सर्वात तरुण आमदार आणि CPI(M) चे युवा नेते सचिन देव यांच्याशी साध्या सोहळ्यात विवाह केला. या सोहळ्याला केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित होते.
लग्नात कोणताही गाजावाजा नव्हता - विवाह सोहळा एक साधा सोहळा होता, ज्यामध्ये सचिन देव आणि आर्य राजेंद्रन यांनी ऐकमेकांना हार घातला. राजेंद्रन आणि देव या दोघांनीही जाहीरपणे सांगितले होते की ते कोणतीही भेटवस्तू घेणार नाहीत आणि जर कोणाला भेटवस्तू द्यायची असेल तर ते मुख्यमंत्री मदत निधीला देणगी देऊ शकतात. तसेच, राज्यातील काही अनाथाश्रमांनाही आपण देणगी देऊ शकतात. लग्नात कोणताही गाजावाजा नसून तो एक छोटासा सोहळा म्हणून आयोजित करण्यात आला होता.
दोघांची एंगेजमेंट 6 मार्च रोजी झाली - राज्यातील जवळपास सर्वच ज्येष्ठ सीपीआय(एम) नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह लग्न समारंभाला हजेरी लावली होती. राज्यमंत्री, आमदार, विरोधी पक्षाचे नेते आणि तिरुअनंतपुरम कॉर्पोरेशनचे नगरसेवकही या लग्नाला उपस्थित होते. दोघांची एंगेजमेंट 6 मार्च रोजी एकेजी सेंटर हॉलमध्ये एकाच ठिकाणी झाली.
पुढे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला - सचिन देव हे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे राज्य सचिव आणि केरळमधील सर्वात तरुण आमदार आहेत, जे कोझिकोड जिल्ह्यातील बालुसेरीचे आहेत. आर्य राजेंद्रन वयाच्या २१ व्या वर्षी तिरुवनंतपुरम मनपाच्या महापौर झाल्या आहेत. त्या देशातील सर्वात तरुण महापौर आहेत. आर्य राजेंद्रन आणि सचिन देव या दोघांनी सीपीआय-एमच्या एसएफआय आणि बालसंगोममध्ये एकत्र काम केले होते. त्यावेळीच त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. पुढे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
जाणून घ्या- आर्य आणि देव बद्दल - आर्य यांची वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिरुअनंतपुरमच्या महापौरपदी निवड झाली. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत भाकपने 100 पैकी 52 प्रभाग जिंकले होते. तर भाजपने 35 जागा जिंकल्या होत्या. यासोबतच आर्या (SFI)च्या स्टेट कमिटीचा सदस्य आहे. तिचे पती सचिन देव हे (SFI) चे राज्य सचिव असताना आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत (CPM)च्या तिकिटावर बालुसेरी येथून आमदार म्हणून निवडून आले. ते 20 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
हेही वाचा - झाड कापल्याने हजारो पक्षांचा जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायल; पक्ष प्रेमींकडून हळहळ व्यक्त