अन्नमय - लॉरीने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पाच जण मृत्युमुखी पडल्याने ( Five members died ) हळहळ व्यक्त केली जात आहे. आंध्रप्रदेशातील अन्नमय जिल्ह्यात हा भीषण रस्ता अपघात झाला. लॉरीने ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती वगळता कुटुंबातील सर्व सदस्य ठार झाले.
केवळ एकजण वाचला - मृतांमध्ये दोन मुले, पत्नी, मावशी आणि एका नातेवाईकांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या ऑटो चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मावशीच्या घरी 3 महिन्यांच्या मुलाचा धार्मिक सोहळा साजरा करून ते निघाले असताना हा अपघात झाला. रेल्वेकोदूर मंडलच्या बी.कम्मापल्ली क्रॉसरोडवर लॉरी आणि ऑटोची धडक झाली. अपघाताच्या वेळी ऑटोमध्ये सहा जण होते. या अपघातात 8 वर्षीय मुलगी, 30 वर्षीय पत्नी आणि मावशी यांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 महिन्यांचा मुलगा आणि अन्य एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. पीडित कृष्णा रेड्डी हा वीज विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता.
हेही वाचा - Lightning struck the school : शाळा सुरु असतानाच कोसळली वीज, ३० मुलं जखमी, एक गंभीर