मुंबई: यंदा आयपीएलचा पंधरावा हंगाम ( Fifteenth season of IPL ) 26 मार्च पासून सुरु होत आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या आयपीएल सामन्यांवर दहशतवादाचे सावट असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर वानखेडे स्टेडियम, ट्रायडेंट हॉटेल आणि दरम्यानच्या रस्त्याची दहशतवाद्यांनी रेकी केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. एटीएसच्या चौकशीत अटकेत असलेल्या दहशतवाद्यांनी याबाबत कबूली दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खेळाडू रहात असलेल्या हॉटेल्स येथे सुरक्षा व्यवस्थेवर जास्त भर देण्यात येणार आहे. 26 मार्च ते 22 मे पर्यंत सर्व सामने महाराष्ट्रात होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी क्विक रिस्पॉन्स टीम ( Quick Response Team ), बाम्ब शोधक पथक आणि राज्य राखीव पोलीस दल तैनात केले जाणार आहेत.