मुंबई: सेन्सेक्समध्ये (SENSEX NIFTY DROPS) टाटा स्टील,(Tata Steel) स्टेट बँक ऑफ इंडिया, (State Bank of India) बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा आणि विप्रो यांचे प्रमुख नुकसान झाले. सोमवारी सेन्सेक्स 482.61 अंकांनी म्हणजे 0.81 टक्क्यांनी घसरून 58,964.57 वर बंद झाला, तर निफ्टी 109.40 अंकांनी किंवा 0.62 टक्क्यांनी घसरून 17,674.95 वर बंद झाला.
आशियाई बाजारांपैकी हाँगकाँग, सोल, शांघाय आणि टोकियो येथील बाजार मध्य सत्रात कमजोर होते. आंतरराष्ट्रीय मानक ब्रेंट क्रूडने दोन टक्क्यांनी उसळी घेत प्रति बॅरल $100.45 पर्यंत पोहोचले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार सोमवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी निव्वळ 1,145.24 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
हेही वाचा - Crypto Prices Fall : क्रिप्टोकरन्सीच्या किमती घसरल्या, गुंतवणुकीची चांगली संधी!