ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश- पुजाऱ्याच्या हट्टापुढे डॉक्टर हैराण... तुटलेल्या मूर्तीवर रुग्णालयात केले प्लास्टर

author img

By

Published : Nov 19, 2021, 5:04 PM IST

डॉक्टरांनी गोपाळ मूर्तीच्या हाताला प्लास्टर केले. सीएमएस अशोक अग्रवाल म्हणाले, की पुजारी हे ह्रदयरोगाचे रुग्ण आहेत. त्यांची स्थिती पाहून दया आली. त्यामुळे त्यांच्या समाधानासाठी मूर्तीवर प्लास्टर केले आहे.

तुटलेल्या मूर्तीवर रुग्णालयात केले प्लास्टर

लखनौै- सरकारी रुग्णालयात माणसांवरच उपचार होतात. मात्र, आग्रामधील जिल्हा रुग्णालयात मूर्तीवर प्लास्टर करण्याची डॉक्टरांवर वेळ आली. कारण, एका पुजाऱ्याने मूर्तीवर प्लास्टर करण्यासाठी गोंधळ घातला होता.

आग्राच्या जिल्हा रुग्णालयात (Agra District Hospital) मंदिराचे पुजारी थेट देवाची मूर्ती घेऊन दाखल झाले. या पुजाऱ्याने रुग्णालयातील डॉक्टरांना कृष्णाच्या मूर्तीच्या तुटलेल्या हातावर शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी विरोध केल्याने पुजारी नाराज झाले. त्यांनी डॉक्टरांच्या समोरच भिंतीवर डोके आपटून घेतले. यावेळी डोके फुटल्याने पुजारी गंभीर जखमी झाले. ही घटना समोर येताच हिंदू संघटनेने मूर्तीच्या हातावर प्लास्टर करण्याची सीएमएस अशोक अग्रवाल यांना विनंती केली. अखेर अग्रवाल यांनी मूर्तीला प्लास्टर केले आहे.

हेही वाचा-NO vaccination no alcohol कोरोनाचे दोन डोस घ्या, मग दारू ढोसा- 'या' राज्यात उत्पादन शुल्क विभागाचे आदेश

पुजारी लेख सिंह (priest Lekh Singh) म्हणाले, की गेल्या 35 वर्षांपासून लड्डू गोपाळची पुजा करत आहे. शुक्रवारी पहाटे 5 वाजता लड्डू गोपाळ यांची पुजा करताना हात तुटला. सकाळी 8 वाजल्यापासून विविध रुग्णालयात प्लास्टर करण्यासाठी भटकत होतो. मात्र, डॉक्टरांनी त्यांना वेडे म्हणून हाकलून दिले होते. ही बाब समजताच हिंदू महासभेने हस्तक्षेप करत लड्डू गोपाळच्या हातावर प्लास्टर करण्यासाठी पुढाकार घेतला.

हेही वाचा-PM Modi Address To Nation : तीनही कृषीकायदे रद्द होणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

पुजाऱ्याला घेऊन हिंदू महासभेचे कार्यकर्ते जिल्हा रुग्णालयात पोहोचले. यावेळी डॉक्टरांनी गोपाळ मूर्तीच्या हाताला प्लास्टर केले. सीएमएस अशोक अग्रवाल म्हणाले, की पुजारी हे ह्रदयरोगाचे रुग्ण आहेत. त्यांची स्थिती पाहून दया आली.

हेही वाचा- Farm Laws Repealed : 'अन्नदात्यानं सत्याग्रह करून अहंकाराचं डोकं खाली झुकवलं'; राहुल गांधींचे टि्वट

मानसिक आरोग्याचे महत्त्व-

सध्याच्या युगात अनेकजण मानसिक आरोग्याच्या समस्येतून जात आहेत. यातील अनेकांना मानसोपचाराची गरज असते. त्यामुळेच लोकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. या समस्येकडे कोणीही दुर्लक्ष करू नये तसेच मानसिक आरोग्याचे महत्त्व समजावे, असे मानसिक आरोग्यतज्ज्ञ सल्ला देतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.