सुरत / मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकी पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणूकीतही महाविकास आघाडी विशेषत: शिवसेनेला मोठा धक्का दिला. आणि निकालाची धामधुन संपायच्या आतच शिंदेंनी आमदारांसह गुपचुप सुरत गाठले आणि महाराष्ट्रात राजकिय भुकंप झाला. महाविकास आघाडीतील धुसफुस आणि त्यावर कायम भाजप कडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभुमीवर शिंदेनी बंडाचा झेडा फडकवल्याचे स्पष्ट झाले. याच वेळी इकडे शिवसेनेने निवडणुकीच्या संदर्भात बैठक आयोजित केली होती तेथेही शिवसेनेच्या अत्यल्प आमदारांची उपस्थिती दिसून आली.
दिवसभर घडामोडींना वेग आला शिवसेनेच्या नेत्यांनी विशेषत: शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही परीणाम होणार नाही ही भाजपची खेळी आाहे पण ती यशस्वी होणार नाही. अनेक आमदारांना बळजबरीने नेले आहे. तेथे त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. अशी सावरासावर राऊतांनी केली. दरम्यानच्या घडामोडीत शिवसेनेच्या बैठकीला शिंदेंचे दुत पोचले होते. त्या नंतर शिवसेनेचे दुत सुरतला पोचले पण त्यांच्यातही यशस्वी बोलणी झाली नाही. आणि राजकीय नाट्य वाढतच गेले.
रात्री उशीरा पर्यंत नाट्य पहायला मिळाले त्यांना गुवाहाटीला नेणार असे सांगण्यात येत होते. रात्री १० वाजल्या पासुन हाॅटेल परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला होता पोलीस बंदोबस्तात रात्री दोन वाजुन १५ मिनटाच्या सुमारास या बस सुरत हाॅटेल मधुन रवाना झाल्या दरम्यान हाॅटेल मधुन बाहेर पडण्यापुर्वी सर्व बंडखोर आमदारांचा एक फोटो बाहेर आला त्यात ते विमानतळाकडे निघण्यापुर्वीचा होता. त्या नंतर मोठ्या पोलीस बंदोबस्ताने या सगळ्या बस रवाना झाल्या तेथुन चार्टर्ड प्लेन ने त्यांना गुवाहटीला नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.