ETV Bharat / bharat

Chief Minister Shivraj Singh Chouhan: मुख्यमंत्र्यांना चवहीन चहा दिल्याबाबत अधिकाऱ्याला बजावलेली नोटीस सोशल मीडियावर तूफान व्हायरल - छतरपूर जिल्हा

छतरपूर जिल्ह्यात (Chhatarpur District) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांना चवहीन आणि थंड चहा पुरवल्याबद्दल कनिष्ठ पुरवठा अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर ही नोटीस मागे घेण्यात आली आहे.

Chief Minister Shivraj Singh Chouhan
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान
author img

By

Published : Jul 13, 2022, 2:54 PM IST

छत्तरपूर: छतरपूर जिल्ह्यात (Chhatarpur District) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांना चवहीन आणि थंड चहा पुरवल्याबद्दल कनिष्ठ पुरवठा अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर ही नोटीस मागे घेण्यात आली आहे.

काँग्रेसचा टोला : चायवाल्यांचा तिरस्कार कशाला?, असा सवाल काँग्रेसने मुख्यमंत्री चौहान यांना केला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रीवाला जाताना छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो विमानतळावर थांबले. जिथे त्यांना दिलेला चहा चवहीन आणि थंड होता. या संदर्भात राजनगर येथील कनिष्ठ पुरवठा अधिकारी राकेश कान्हावा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटीस मागे : राजनगरचे एसडीएम डीपी द्विवेदी यांनी ही नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान 11 जुलै रोजी खजुराहोला गेले होते. यावेळी त्यांना थंड व निकृष्ट दर्जाचा चहा देण्यात आला. तेव्हा, या नोटिसला तीन दिवसांत उत्तर द्या. चहा संदर्भातली ही नोटीस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर यासंदर्भात आणखी चर्चा होऊ नये. यासाठी ही नोटीस मागे घेण्यात आली आहे.

हेही वाचा :Eknath Shinde On Bangar : उद्धव ठाकरेंकडून हाकलपट्टी तर एकनाथ शिंदेंकडून संतोष बांगर यांचे पुनर्वसन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.