नवी दिल्ली - शेतमालाचे किमान समर्थन मुल्य कायम राहील आणि शेतकऱ्यांची जमीन त्यांच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, असे आश्वासन रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिले. हिमांचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आज राज्यातील नागरिकांशी संवाद साधताना राजनाथ सिंह यांनी हे विधान केले.
ज्यांना शेती येत नाही अशी लोकं आज शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने कधीही किमान समर्थन मुल्य हटवण्याचा प्रयत्न केला नाही आणि भविष्यात असा विचार देखील करणार नाही, मंड्यांही जपल्या जातील. 'कोई माई का लाल' शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन घेऊ शकणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.
हेही वाचा - पतीचे निधन झाल्याचे समजताच पत्नीचाही मृत्यू
तसेच, राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले. जयराम ठाकूर यांनी यशस्वीरित्या ३ वर्ष सरकार चालवली आहे. यासाठी मी हिमांचल प्रदेशच्या नागरिकांना शुभेच्छा देतो. तसेच, राज्यात जेव्हा यूपीएची सत्ता होती तेव्हा राज्याला २२ हजार कोटी रुपये मिळाले होते. मात्र, जेव्हा मोदी सरकार सत्तेत आली, तेव्हा आम्ही तीनपट जास्त पैसा दिला. हिमांचल प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला ध्यानात ठेवनूच हा निधी देण्यात आला, असे राजनाथ सिंह म्हणाले.
दरम्यान, गेल्या एक महिन्यापासून शेतकरी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी हे सिंघू सिमेवर आंदोलन करत आहेत. याप्रकरणी शेतकरी संघटनांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी एक बैठक देखील केली आहे. दरम्यान, ४० शेतकरी संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या समयुक्त किसान मोर्चाने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला चिठ्ठी लिहून केंद्राच्या चर्चेच्या प्रस्तावाला होकार दर्शवला आहे. बैठकीसाठी २९ डिसेंबर हा दिवस ठरवण्यात आला आहे.
हेही वाचा - सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज