ETV Bharat / bharat

प्रमुख विमा योजनांचा प्रीमियम वाढला; वाचा सविस्तर कोणत्या आहेत या योजना - प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) च्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. आता (PMJJBY)साठी वार्षिक 436 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.

प्रमुख विमा योजनांचा प्रीमियम वाढला
प्रमुख विमा योजनांचा प्रीमियम वाढला
author img

By

Published : Jun 1, 2022, 11:13 AM IST

नवी दिल्ली - सरकारने मंगळवारी आपल्या प्रमुख विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ केली - प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या योजना आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी हे केले गेले. PMJJBY चा प्रीमियम दर प्रतिदिन रु.1.25 इतका वाढवला आहे. अशाप्रकारे तो वार्षिक 330 रुपयांवरून 436 रुपयांपर्यंत वाढला आहे.

अधिकृत निवेदनात म्हटले आहे, की (PMSBY) साठी वार्षिक प्रीमियम 12 वरून 20 रुपये करण्यात आला आहे. नवीन प्रीमियम दर (1 जून 2022) पासून लागू होणार आहेत. अशा प्रकारे (PMJJBY)चा प्रीमियम 32 टक्के आणि (PMSBY) 67 टक्क्यांनी वाढला आहे. या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या दाव्यांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच (३१ मार्च २०२२) पर्यंत PMJJBY आणि PMSBY अंतर्गत सक्रिय ग्राहकांची संख्या अनुक्रमे ६.४ कोटी आणि २२ कोटी होती. PMSBY लाँच झाल्यापासून (31 मार्च 2022) पर्यंत, प्रीमियम म्हणून 1,134 कोटी रुपये जमा झाले आहेत आणि 2,513 कोटी रुपयांचे दावे अदा करण्यात आले आहेत.

याशिवाय, PMJJBY अंतर्गत प्रीमियम म्हणून 9,737 कोटी रुपये जमा करण्यात आले आणि 14,144 कोटी रुपयांचे दावे अदा करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताला संपूर्ण विमाधारक समाज बनवण्याच्या दृष्टीकोनानुसार, पुढील पाच वर्षांत PMJJBY अंतर्गत कव्हरेज 6.4 कोटींवरून 15 कोटी आणि PMSBY कव्हरेज 22 कोटींवरून 37 कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

PMJJBY 18-50 वर्षे वयोगटातील बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते असलेल्या लोकांना कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण प्रदान करते. दुसरीकडे, PMSBY, अपघाती मृत्यू किंवा एकूण कायमस्वरूपी अपंगत्वासाठी रु. 2 लाख आणि 18-70 वयोगटातील लोकांसाठी आंशिक कायमस्वरूपी अपंगत्वासाठी रु. 1 लाख विमा संरक्षण प्रदान करते.

हेही वाचा - Singer KK passes away: लोकप्रिय गायक केके काळाच्या पडद्याआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.