उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील सलुंबर भागात एका आईने पोटच्या दोन मुलिंनी पायावर गडगडत जोर जोरात रडत केलेली विनंती धुडकावत सगळ्यांशी सर्व नाते तोडल्याची घटना समोर आली आहे. ज्या आईने आपल्या मुलांना 9 महिने पोटात ठेवले. मुलांचे संगोपन करून त्यांना वाढवले, पण प्रियकराच्या प्रेमात ती इतकी वेडी झाली की ती प्रेमळ नाते विसरली. हे संपूर्ण प्रकरण उदयपूरच्या सालुंबर भागातील असल्याचे सांगितले जात आहे.
कुटुंबाला केले बेदखल : दोन गोंडस मुली आणि पती असलेल्या एका महिलेचे हृदय एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीवर जडले. विवाहित महिलेचा सुखी संसार सुरु होता मात्र असे असतानाही त्या महिलेने आपल्या मुलांची आणि कुटुंबाची काळजी तर सोडा थोडाही विचार न करता फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याशी सुत जमवत सगळ्यांशी नाते तोडत लग्न केले.
अचानक पडल्या प्रेमात : कर्जाच्या हप्त्यासाठी गावाला येत असताना या महिलेची फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्या सोबत ओळख झाली. नंतर मैत्री आणि पुढे त्यांच्यात प्रेमाचे सुतही जुळले. अखेर 2 एप्रिल रोजी तीने प्रियकरासोबत कोर्टही मॅरेज केले. लग्नाच्या 15 वर्षांनंतर महिलेच्या या निर्णयामुळे संपूर्ण गाव, कुटुंब आणि परिसर आचंबित झाला आहे.
पहिल्या पती विरोधात तक्रार : महत्वाचे म्हणजे या महिलेला १० आणि ५ वर्षांच्या दोन मुली आहेत. आईचे हे कृत्य पाहुन त्यांना रडू आवरत नव्हते, रडून रडून या मुलींची अवस्था वाईट झाली. यातच संबंधित महिलेने पोलिस अधिक्षक कार्यालयात अर्ज करुन, माझ्या पहिल्या पतीपासून मला आणि माझ्या प्रियकराच्या जीवाला धोका आहे. असे कळवले आहे.
मुली ढसाढसा रडत राहिल्या: आईच्या या कृत्यामुळे बिथरलेल्या मुलिंनी आईला आम्हांला सोडून जाऊ नकोस अशी विनवणी केली. दोन्ही मुली आईच्या पायाला मिठी मारून विनवणी करत राहिल्या. पण ना आईचे मन पघळले ना तिच्या प्रियकराने मुलांकडे पाहिले. जिल्हाधिकारी कार्यालयातच ती महिला आणि तीच्या मुलिंमधे ममतेला पाझर फोडणारे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
हेही वाचा : Pune Mother Memorial: आईच्या स्मरणार्थ उभारले घरासमोर आईचे स्मारक; 'त्या' दोघा भावांनी ठेवला समाजासमोर आदर्श