ETV Bharat / bharat

Uttarakhand First Result 2022 : उत्तराखंडचा पहिला निकाल हाती, मसुरी मतदारसंघातून भाजपे गणेश जोशी विजयी - निकाल उत्तराखंड विधानसभा

उत्तराखंड निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. भाजपचे दिग्गज नेता गणेश जोशी हे काँग्रेसच्या गोदावरी थापली यांचा पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. आज उत्तराखंडसह उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा व मणिपूर या राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. संध्याकाळपर्यंत या विविध राज्यात कोणाची सरकार बसेल हे चित्र स्पष्ट होणार आहे.

गणेश जोशी
गणेश जोशी
author img

By

Published : Mar 10, 2022, 1:34 PM IST

हैदराबाद - उत्तराखंड निवडणुकीचा पहिला निकाल मसूरी विधानसभा मतदारसंघातून समोर आला आहे. भाजपचे दिग्गज नेता गणेश जोशी हे काँग्रेसच्या गोदावरी थापली यांचा पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. ते सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आज उत्तराखंडसह उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा व मणिपूर या राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. संध्याकाळपर्यंत या विविध राज्यात कोणाची सरकार बसेल हे चित्र स्पष्ट होणार आहे.

उत्तराखंड विधानसभेचा निवडणूक निकाल अवघ्या काही तासांतच आपल्या समोर येणार आहे. अनेक मुद्द्यावरून या निवडणुकीतील प्रचार सभा गाजल्या. राज्यातील 70 विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 632 उमेदवार रिंगणात उतरले असून त्यापैकी केवळ 62 महिला उमेदरवार आहेत. राज्यात 81 लाख 72 हजार 173 मतदार आहेत. त्यापैकी 53 लाख 42 हजार 462 मतदारांनी मतदान केले आहे. काही तासांत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार असून जनतेचा कौल कोणाकडे असेल हे चित्र स्पष्ट होणार आहे.

632 जणांच्या नशिबाचा आज होणार फैसला - उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022 मध्ये मुख्य दोन्ही राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त इतर पक्ष व अपक्ष, असे 632 जण रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या नशिबाचा आज फैसला होणार आहे. निवडणूक आल्यानंतर कशा प्रकारे बहुमत सिद्ध करायचे. स्पष्ट बहुमत नसल्यास सरकार स्थापन करताना कोणाची मदत घ्यावी लागले, कोणाकडे कोणते मंत्रीपद असेल, याबाबत दोन्ही प्रमुख पक्ष नियोजन करत आहेत.

चौथ्यांदा आले निवडूण - सलग तीनवेळा विधानसभा निवडणूक जिंकून भाजपचे वरिष्ठ नेता गणेश जोशी यांनी हॅट्ट्रीक केली आहे. 2007 साली राजपूर मतदार संघातून गणेश जोशी यांनी पहिल्यांदा आमदारकी मिळवली. त्यानंतर 2012 व 2017 साली मसूरी मतदारसंघातून ते जिंकून आले. काँग्रेसच्या जोत सिंह यांना 2012 च्या निवडणुकीत सुमारे 9 हजारांच्या फरकांनी त्यांनी धूळ चारली. 2017 च्या निवडणुकीत गोदावरी थापली यांचा 19 हजारांहून अधिकच्या फरकाने पराभव केला. यावेळीही काँग्रेसकडून गोदावरी थापली याच मैदानात आहेत.

उत्तराखंड निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट मराठीतून पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.