हैदराबाद (तेलंगणा) : Gold ATM: देशातील पहिल्या गोल्ड एटीएमचे शनिवारी हैदराबादच्या बेगमपेटमध्ये Begumpet Hyderabad उद्घाटन करण्यात Hyderabad Gold ATM आले. त्यात तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डने इच्छित सोने काढू शकता. first Gold ATM in India
अशोक रघुपती चेंबर्समधील गोल्ड सिक्का कंपनीच्या कार्यालयात उभारण्यात आलेल्या या एटीएमचे उद्घाटन तेलंगणा महिला आयोगाच्या अध्यक्षा सुनीता लक्ष्मरेड्डी यांनी केले. उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे उदाहरण म्हणून त्यांनी गोल्ड एटीएमचे वर्णन केले. गोल्ड सिक्काचे सीईओ सय्यद तरुज यांनी सांगितले की, या एटीएमद्वारे 0.5, 1, 2, 5, 10, 20, 50 आणि 100 ग्रॅम सोन्याची नाणी 99.99 टक्के शुद्धतेसह काढता येतील.
सोन्याच्या नाण्यांसोबत त्यांची गुणवत्ता आणि हमी देणारी कागदपत्रेही जारी केली जातील. शहरातील गुलजारहाऊस, सिकंदराबाद, अबिड्स, पेड्डापल्ली, वारंगल आणि करीमनगर येथे लवकरच सोन्याचे एटीएम सुरू होणार आहेत. एटीएमच्या स्क्रीनवर वेळोवेळी सोन्याचे दर दिसून येत असल्याचे समोर आले आहे.