लखनऊ ( उत्तर प्रदेश ) - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यामुळे ब्रिटनचे उच्चायुक्त एलेक्स एलिस यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने पत्राद्वारे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटण्याबाबतही इच्छा व्यक्त केली आहे. ब्रिटेनच्या उच्चायुक्तांनी अपल्या पत्रात 2021 मध्ये भारत व यूनाइटेड किंगडम यांच्या पंतप्रधानांच्यात झालेल्या कराराचा वशिला देत 10 वर्षांच्या रोड मॅपनुसार यूनाइटेड किंगडम उत्तर प्रदेशसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय भागीदार बनवण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री व त्यांच्यात झालेल्या मागच्या बैठकीवेळी उत्तर प्रदेश व यूनाइटेड किंगडम यांच्यात व्यापार व गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा झाली हती. त्यानुसार काम करण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
ब्रिटिश काउंसिलिंगचे नवीन 'गोइंग ग्लोबल पार्टनरशिप एक्सप्लोरेटरी ग्रांट्स' ( Going Global Partnerships Grant ) अंतर्गत शिक्षणासाठी यूकेच्या तीन महाविद्यालयाने नोएडा येथे अमिटी विद्यापीठाला ( Amity University ) सहकार्य केले आहे. यामुळे विजेत्यांना यूपी व यूनाइटेड किंगडमच्या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय शिक्षण व शिक्षणातील सहकार्यातून मजबूत करण्यासाठी मदत ब्रिटेनचे उच्चायुक्त एलेक्स एलिस म्हणाले, ब्रिटिश काउंसिलकडून देण्यात येणाऱ्या 'मित्रांसोबत इंग्रजी शिका' या डिजिटल लर्निंगच्या माध्यमातून कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील 750 विद्यार्थींनींना इंग्रजी भाषेचे शिक्षण दिले जात आहे.
ब्रिटिश उच्चायुक्त यांनी मेरठ येथे नुकतेच सुरू झालेल्या मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ ( Major Dhyan Chand Sports University ) बाबत म्हणाले, या विद्यापीठाच्या माध्यमातून सर्वोत्तम क्रीडा शिक्षण देण्यासाठी तंत्र व संरचनामध्ये यूकेचे काही विशेष अभ्यासाचे समाविष्ठ करू शकता. एलिस हे यूके व उत्तर प्रदेशमध्ये अनेक करार करण्यासाठी इच्छूक आहेत. यूके रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन ( यूकेआरआई ) ने मागील 12 वर्षांत बनारस हिन्दू विद्यापीठासह उत्तर प्रदेशच्या विविध संस्थांमध्ये 4.3 मिलियन पाउंडहून अधिक वित्त पुरवठा केले आहे. शेवटी एलिस यांनी मुख्यमंत्री व उत्तर प्रदेशच्या जनतेला पुढील 5 वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - Road accident Kamareddy: कामारेड्डी येथे वाहन अपघातात 5 लोकांचा मृत्यू, एक जखमी