पटना (बिहार) - बिहारमधील पूल दुर्घटनेप्रकरणी आयएएस अधिकाऱ्याने दिलेले उत्तर ऐकून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 'जोराचा वारा आल्यानेच बांधकामाधीन असलेल्या या रस्त्यावरील पुलाचा काही भाग कोसळला' अस या अधिकाऱ्याने नितीन गडकरी यांना उत्तर देताना सांगितले आहे. ( Bihar Bridge Collapse On Gadkari ) 29 एप्रिलला बिहारमधील सुलतानगंज येथील काम सुरु असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “२९ एप्रिलला बिहारमध्ये पूल कोसळला. मी माझ्या सेक्रेटरीला या दुर्घटनेची कारण विचारली. यावर त्याने मला जोराचा वारा सुटला असल्याने पूल कोसळला असे उत्तर दिले. आयएएस अधिकाऱ्याचे हे उत्तर ऐकून नितीन गडकरींना आश्चर्याचा धक्काच बसला. एक आयएएस अधिकारी असे उत्तर कसे काय देऊ शकतो? असे गडकरी यावेळी म्हणाले आहेत.
मला एक समजत नाही हवेने कसा काय पूल कोसळू शकतो? काहीतरी चूक झाली असणारच, असे नेहमी आपली परखड मते मांडणाऱ्या गडकरीनी सांगितले. नितीन गडकरी यांनी यावेळी दर्जेाशी तडजोड न करता पुलाच्या कामाचा खर्च कमी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सुलतानगंजचे आमदार ललित नारायण मंडल यांनी याआधी मुख्यमंत्र्यांनी पूल दुर्घटना प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती दिली होती.
1710 कोटींचा खर्च करुन उभारला जात असलेला पूल जोराचा वारा सहन करु शकत नसेल, तर हा चौकशीचा विषय असल्याचे गडकरी म्हणाले. 3116 मीटर लांब असलेल्या या पुलाचं काम 2014 मध्ये सुरु झाले होते. 2019 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही हे काम सुरु आहे.
हेही वाचा - Pulitzer Prize: दिवंगत फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांचा पुलित्झर पुरस्काराने सन्मान