पणजी - देशभरात सध्या कोरोनाचे सावट असताना ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणी चालू आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी ज्ञान कुठून उपलब्ध होणार, यासाठी राज्य सरकारने गेल्या लॉकडाउनमध्ये राज्यातील शिक्षकांना घरबसल्या शिक्षण क्षेत्रातील माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी निष्ठा( नॅशनल एनिटीएटीव्ह फॉर स्कूल हेड ऍण्ड टीचर्स हॉलिस्टिक ऍडवांसमेंट)ही शिक्षण प्रणाली विकसित केली होती. आज या प्रणालीचा दुसरा भाग अर्थात निष्ठा 2 ची सुरूवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
'निष्ठामुळे शिक्षक होणार अद्यावयत'
या शिक्षण प्रणालीमुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या शिक्षण क्षेत्रातील माहिती उपलब्ध होणार असून, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना घरबसल्या याचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी यावेळी सांगितले.
'आम्हीच नंबर वन'
गोवा राज्य हे देशभरात शिक्षण क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या बाबतीत आघाडीवर आहे. राज्य शिक्षण क्षेत्रात एक नंबरवर असून, त्याची तुलना कोणत्याही राज्याशी होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले, त्यात आप आम आदमी पक्ष ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. त्यातच दिल्लीतले नेते राज्यात येऊन येथील जनतेला दिल्लीच्या सुविधांची माहिती देत आहेत. दिल्ली कशी शिक्षण, आरोग्य, वीज क्षेत्रात आघाडीवर आहे, त्याचे गोडवे गात आहेत. त्यातच नुकतेच भाजपचे माजी आमदार व मंत्री असणाऱ्या महादेव नाईक यांनी राज्यातील आप नेत्यांसोबत दिल्लीत जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश केला होता.
महादेव नाईक यांचा आपमध्ये प्रेवश
महादेव नाईक यांनी प्रेवश केला त्यावेळी राज्यातील आपच्या नेत्यांनी दिल्लीत तेथील शाळांना भेट देऊन पुन्हा एकदा तिथल्या शिक्षण व्यवस्थेचे गोडवे गायले होते. त्याच्या बातम्या गोव्यातील्या माध्यमांतून प्रकाशित झाल्या होत्या. म्हणून, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना आपणच शिक्षण क्षेत्रात नंबर एकवर असल्याचे सांगावे लागले आहे.