हुबळी (कर्नाट) - वास्तूशास्त्र तज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकातील हुबळी येथे मंगळवार (दि. 5 जुलै)रोजी दोन जणांनी चाकूचे वार करत हत्या केली. येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पाहुण्यांना भेटण्यासाठी ते गेले असता ही घटना घडली. ( Architect Chandrasekhar Guruji ) येथे दोनजण भाविक म्हणून आले होते. गुरुजी तेथे आल्यानंतर त्यांनी गुरुजींचे दर्शन घेण्याचे नाटक केले आणि त्यावेळीच चाकूने वार करत गुरूजींची जाग्यावरच हत्या केली.
कोण होते चंद्रशेखर गुरुजी - चंद्रशेखर गुरुजी यांचा बागलकोट जिल्ह्यातील अंगडी येथे जन्म झाला होता. विरुपक्षप्पा आणि नीलमा अंगडी असे त्यांच्या आई-वडिलांचे नाव आहे. ( Who Was Chandrasekhar Guruji ) गुरुजींना लहानपणापासूनच सैन्यात जायची इच्छा होती. पण शारीरिक मानदंडात न बसल्याने त्यांची निवड होऊ शकली नाही. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते.
गाव दत्तक घेण्याचा कार्यक्रम - गुरुजी मुंबईत नोकरी मिळाली आणि ते तेथेच स्थायिक झाले. गुरुजींनी एका बांधकाम कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली. (1999)च्या सुरुवातीच्या काळापर्यंत ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक होते. परंतु, तो व्यवसाय काही त्यांना मानवला नाही. त्या व्यवसायातही त्यांना बराच तोटा झाला. त्यानंतर ते वास्तूशास्त्राकडे वळले. त्यानंतर मानव अभिवृद्धी अभियानाअंतर्गत त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. तसेच, मोठ्या प्रमाणात गाव दत्तक घेण्याचा कार्यक्रम त्यांनी राबवला. तसेच, कर्नाटकात ग्रामीण भागात त्यांनी शाळाही सुरू केली.
ग्रामीण भागात त्यांनी शाळाही सुरू - एका बांधकाम कंपनीत काम केल्यानंतर गुरुजींनी त्यांची कंपनी सुरू केली. 1999 च्या सुरुवातीच्या काळापर्यंत ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक होते. त्या व्यवसायातही त्यांना बराच तोटा झाला. त्यानंतर ते वास्तूशास्त्राकडे वळले. मानव अभिवृद्धी अभियानाअंतर्गत त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. तसेच, मोठ्या प्रमाणात गाव दत्तक घेण्याचा कार्यक्रम त्यांनी राबवला. तसेच, कर्नाटकात ग्रामीण भागात त्यांनी शाळाही सुरू केली.
हेही वाचा - NIA प्रमुखांनी कन्हैयालाल हत्येबाबत अमित शहा यांना दिली माहिती