ETV Bharat / bharat

Terrorist killed in JK: घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, सुरक्षा दलाकडून नियंत्रण रेषेवर दोन दहशतवाद्यांचा खात्मा - दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्यदल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, नियंत्रण रेषेवर संशयास्पद हालचाल सुरू होती. हे लक्षात येताच शोध मोहीम सुरू करण्यात आली.

Terrorist killed in JK
दोन दहशतवाद्यांचा खात्मा
author img

By

Published : Jul 17, 2023, 1:21 PM IST

श्रीनगर : भारतीय सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. सुरक्षा दलाने घुसखोरी करू पाहणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आणखी दहशतवादी परिसरात लपल्याचा संशय आहे. त्यामुळे शोध मोहीम अजूनही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पुंछ सेक्टरमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत. त्यानंतर सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी नियंत्रण रेषेवर (एलओसी) दहशतवाद्यांना पडकण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.

गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनच्या हालचाली वाढल्या आहेत. ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी व बेकायदेशीर शस्त्र पुरवठा करण्याचे पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यात, 5 जून रोजी, बीएसएफने अमृतसरजवळ अंमली पदार्थांची वाहतूक करणारा एक पाकिस्तानी ड्रोन पाडला. बीएसएफच्या माहितीनुसार 4 जून रोजी रात्री 9.45 च्या सुमारास जवानांना ड्रोनचा आवाज आला. सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी ड्रोनला रोखण्यासाठी गोळीबार केला. यावेळी जवानांनी ड्रोनला बेकायदेशीर सामानासह यशस्वीपणे जमिनीवर पाडले. हा ड्रोन पाकिस्तानचा असल्याचे तपासात समोर आले आहे.

  • Two infiltrators have been eliminated and a major infiltration bid foiled in a joint operation by Indian Army and J&K Police. During the night of 17 Jul 23 in Poonch Sector. Search operations are in Progress: Indian Army

    — ANI (@ANI) July 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ड्रोनच्या मदतीने ड्रग्जचा पुरवठा- अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानकडून पंजाबमधील सीमेनजीक असलेल्या गावांना लक्ष्य करण्यात येत आहे. बीएसएफ जवानांनी 9 जून रोजी राय गावात सुमारे पाच किलो हेरॉईन जप्त करून मोठी कारवाई केली. या भागात पाकिस्तानी ड्रोनच्या मदतीने ड्रग्ज पुरविण्यात आल्याचे शोध मोहीम राबवण्यात आली. गावात गस्त घालत असताना सुरक्षा दलांना पाकिस्तानी ड्रोन सीमा ओलांडून आल्याचे लक्षात आले. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीसह बेकायदेशीर कृत्ये करण्यात येत आहेत.

एनआयकडून दहशतवाद्याला अटक- पाकिस्तानमधील दहशतवादी देशांतर्गत कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यामागे पाकिस्तानमधील दहशतादी संघटनेशी संबंधित अफसर पाशा हा मास्टर माईंड आहे. त्याला एनआयए पथकाने अटक केली असून त्याची 19 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. भारतीय सैन्यदलाकडून पाकिस्तानचे प्रयत्न सातत्याने हाणून पाडण्यात येत आहेत. सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी यावर्षी अनेक घुसखोरांना अटक केली आहे.

हेही वाचा-

  1. Seema Haider News: सीमाला पाकमध्ये परत पाठवा, अन्यथा पुन्हा मुंबईवर हल्ला...मुंबई पोलिसांना धमकी, नेमके प्रकरण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.