ETV Bharat / bharat

कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी राजस्थानच्या बँक मॅनेजरची केली हत्या - बँक मॅनेजरची हत्या

गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका व्यक्तीची हत्या केली. बँक मॅनेजर असे या व्यक्तीची ओळख पटली असून तो मूळचा राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होता. आरेह मोहनपोरा येथील स्थानिक देहाती बँकेत दहशतवाद्यांनी बँक व्यवस्थापकावर गोळीबार केला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शोक व्यक्त केला आहे.

कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी राजस्थानच्या बँक मॅनेजरची केली हत्या

author img

By

Published : Jun 2, 2022, 2:39 PM IST

जयपुर- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एक टार्गेट किलिंग केली आहे. बुधवारी कुलगाममधील एका बँकेत घुसून दहशतवाद्यांनी राजस्थानमधील हनुमानगड येथे राहणारे बँक मॅनेजर विजय बेनिवाल यांची गोळ्या झाडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मोहनपोरा शाखेत विजय बेनिवाल यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. बेनिवाल हे हनुमानगढच्या भगवान गावचे रहिवासी होते. हत्येची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.