बारामुल्ला Terrorists fired in Jammu Kashmir : जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा उन्माद कमी होता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दोन दिवसांपूर्वीच 5 जवान हुतात्मा झाल्याची घटना ताजी असतानाच आता बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी एका निवृत्त एसएसपीची हत्या केली. मोहम्मद शफी त्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. विशेष म्हणजे अजान पठण करताना दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मोहम्मद शफी यांचा मृत्यू झाला आहे.
-
#WATCH | Baramulla, J&K: Area cordoned off after terrorists fired upon a retired police officer, Mohd Shafi, at Gantmulla, Sheeri Baramulla, while praying Azan in the mosque and succumbed to injuries.
— ANI (@ANI) December 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Visuals deferred by unspecified time) https://t.co/2RZuD3G404 pic.twitter.com/iFR5DUNRkO
">#WATCH | Baramulla, J&K: Area cordoned off after terrorists fired upon a retired police officer, Mohd Shafi, at Gantmulla, Sheeri Baramulla, while praying Azan in the mosque and succumbed to injuries.
— ANI (@ANI) December 24, 2023
(Visuals deferred by unspecified time) https://t.co/2RZuD3G404 pic.twitter.com/iFR5DUNRkO#WATCH | Baramulla, J&K: Area cordoned off after terrorists fired upon a retired police officer, Mohd Shafi, at Gantmulla, Sheeri Baramulla, while praying Azan in the mosque and succumbed to injuries.
— ANI (@ANI) December 24, 2023
(Visuals deferred by unspecified time) https://t.co/2RZuD3G404 pic.twitter.com/iFR5DUNRkO
- मिळालेल्या माहितीनुसार बारामुल्लातील जेंटमुल्ला, शेरी इथं सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी हे मशिदीत अजान पठण करत होते. तेव्हा मोहम्मद शफी यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. तसंच परिसरात गोळीबार करुन संशयित दहशतवादी घटनास्थळावरुन पळून गेले.
दहशतवादी हल्ल्यानंतर परिसराची नाकेबंदी : बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांच्या या कारवाईनंतर या भागाची नाकेबंदी करण्यात आलीय. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "शेरी बारामुल्ला येथील जेंटमुल्ला इथं निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी ते मशिदीमध्ये अजान पठण करत होते. यात गोळी लागल्यानं त्यांना प्राण गमवावे लागले. यानंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून लोकांना परिसरापासून दूर राहण्यास सांगण्यात आलंय. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे."
काही दिवसांपासून दहशतवादी कारवायात वाढ : गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड कारवाया वाढतच आहेत. यापूर्वी पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर छुपा हल्ला झाला होता. यात 5 जवान हुतात्मा झाले होते. तर तीन जवान जखमी झाले होते. यानंतर आता दहशतवाद्यांनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला लक्ष्य केलंय.
आतापर्यंत 19 जवान हुतात्मा : राजौरी, पुंछ आणि रियासी जिल्ह्यात या वर्षी झालेल्या चकमकीत आतापर्यंत 19 सुरक्षा जवान हुतात्मा झाले आहेत. तर यात 28 दहशतवादी मारले गेले आहेत. या चकमकीत एकूण 54 लोक मारले गेले आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये जंगल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये नऊ जवान हुतात्मा झाले होते. 11 ऑक्टोबर रोजी चमरेरमध्ये एका कनिष्ठ अधिकार्यासह (जेसीओ) पाच लष्करी जवान हुतात्मा झाले होते, तर 14 ऑक्टोबरला जवळच्या जंगलात एक जेसीओ आणि तीन सैनिकांनी प्राण गमावले होते.
हेही वाचा :