श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा निरपराध नागरिकांना लक्ष केले आहे. दहशतवाद्यांनी यावेळी काश्मिरी पंडितावर निशाणा साधला आहे. काश्मीरच्या शोपियान (Shopian) जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताला गोळ्या घालून जखमी केले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
शोपियानच्या संपूर्ण परिसराला वेढा - आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्याची जबाबदारी स्वीकारली नाही आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या काश्मिरी पंडिताचे नाव पूरण कृष्ण भट असून ते शोपियानच्या चौधरी गुंडमध्ये बाग लावण्यासाठी जात असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. हल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू आहे.
कठोरात-कठोर शिक्षा - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू आहे. जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांनी काश्मिरी पंडिताच्या हत्येचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट केले की, "मी लोकांना आश्वासन देतो की गुन्हेगार आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना कठोरात-कठोर शिक्षा दिली जाईल असही ते म्हणाले आहेत.
काश्मिरी पंडित यांच्या हत्येवर डीआयजी आणि स्थानिक रहिवाशांची प्रतिक्रिया - दरम्यान, काश्मिरी पंडिताच्या हत्येचा राजकारण्यांनी निषेध केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, "आणखी एक निंदनीय हल्ला. मी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो, ज्यात पूरण कृष्ण भट्ट यांना प्राण गमवावे लागले. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो. शांती लाभो." अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
या भागातील शांतता बिघडवणे - पक्षाचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी म्हणाले, "मी शोपियानमधील पूरण कृष्ण भट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझी संवेदना आहे. हे भ्याड कृत्य आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो." भारतीय जनता पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस अशोक कौल म्हणाले, शोपियान जिल्ह्यातील काश्मिरी पंडितांवर आणखी एक भ्याड हल्ला. कौल यांनी या हत्येला रानटी ठरवले आणि या दु:खाच्या वेळी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. कौल म्हणाले, "या गोष्टी यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत. कारण, या हल्ल्यांचा उद्देश या भागातील शांतता बिघडवणे आहे."