बंगळुरू : केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) कर्नाटकातील बंगळुरू येथे 5 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहेत. अटकेत असलेले 5 दहशतवादी हे बंगळुरूमधील वेगवेगळ्या भागातील आहेत. हे दहशतवादी बंगळुरूमध्ये स्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचा संशय आहे.
मोठा कट उधळला : तपास अधिकाऱ्यांनी संशयीत दहशतवाद्यांना अटक करुन मोठा कट उधळून लावला आहे. या दहशतवाद्यांनी मोठा विस्फोट करण्याची योजना आखली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या कटकारस्थानात 10 जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. या दहशतवाद्यांची माहिती आधी गुप्तचर विभागाला मिळाली होती. गुप्तचर विभागाने ही माहिती बंगळुरू सीसीबी टीमला दिली. त्यानंतर या दहशतवाद्यांच्या अटकेसाठी सीसीबी पोलिसांनी इंटेलिजन्स आणि एनआयएसोबत मिळून कारवाई केली. संशयित दहशतवाद्यांशी संबंधित आणखी लोकांचा शोध सुरू असल्याचे सीसीबीच्या सूत्रांनी सांगितले.
दहशतवाद्यांची नावे : सीबीसीच्या अटकेत असललेल्या पाच जणांची नावे सय्यद सुहेल, उमर, जानिद, मुदासीर आणि जाहिद अशी आहेत. हे सर्वजण 2017 मध्ये झालेल्या एका खुनेतील आरोपी आहेत. हे सर्वजण परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात होते. तेथेच ते दहशतवाद्यांच्या संपर्कात आले होते. गुप्त माहितीच्या आधारे एका पथकाने छापा टाकून संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दोन जणांचा शोध सुरू : या आरोपींकडून स्फोटके, 4 वॉकीटॉकी, 7 देशी बनावटीची पिस्तूल, 42 जिवंत गोळ्या, दारूगोळा, 2 ड्रॅगर, 2 सॅटेलाइट फोन आणि 4 ग्रेनेड सापडले आहेत. या दहशतवाद्यांची चौकशी माडीवाला टेक्निकल सेलमध्ये करण्यात येत आहे. सीसीबी अधिकारी संशयित मोबाईल फोनची तपासणी करत आहेत. तपास अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, या कारस्थानात अजून दोन जणांचा समावेश आहे. या दोघांची माहिती घेतली जात असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा -