उत्तरकाशी (उत्तराखंड) - जिल्ह्यातील गंगोत्री महामार्गावर एका टेम्पो ट्रॅव्हलरचा ( Maharashtra people accident Uttarkashi ) अपघात झाला आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ( Gangotri highway accident news ) एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघातात 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. कोपांग बंदजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच कोपांग येथील आयटीबीपीचे जवान अपघातस्थळी पोहचले. हर्षिल ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहचले.
हेही वाचा - Vegetable Prices: भाजीपाला, धान्याच्या दरांमध्ये कितीने वाढ झाली; वाचा आजचे दर
आयटीबीपी आणि हर्षिल पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. गाडीतील सर्व जखमींना तात्काळ आर्मी हॉस्पिटल, हर्षिल येथे नेण्यात आले. या दरम्यान दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुष प्रवाशाचा समावेश आहे. उर्वरित जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. 7 गंभीर जखमी प्रवाशांना 108 आपत्कालीन सेवेद्वारे जिल्हा रुग्णालय उत्तरकाशी येथे पाठविण्यात आले आहे.
अलका बोटे (वय 45, रा. औरंगाबाद) आणि माधवन अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर उमा पाटील, अर्णभ महर्षी, साक्षी सिंधे, अर्चना सिंधे, अनया महाजन, अनुप्रिया महर्षी, सही पवार, सुभाषसिंग राणा (रा.मानपूर) डॉ. व्यंकटेश, वर्षिता पाटील, आमरा बोटे, रजनीश सेठी हे जखमी झाले आहेत. अपघातात डेहराडूनच्या प्रेमनगर येथील रहिवासी जितेंद्र सिंह जखमी झाले आहेत. वाहनातील बहुतांश प्रवासी हे औरंगाबाद महाराष्ट्रातील आहेत.
हेही वाचा - Petrol Diesel Rates Today: पेट्रोल डिझेलच्या दरात स्थिरता; वाचा आजचे नवे दर