ETV Bharat / bharat

KTR Top 30 Influencers : तेलंगाणाचे मंत्री केटीआर जागतिक 30 प्रभावशाली नेत्यांच्या यादीत, सोशल माध्यमात वेगळी ओळख

author img

By

Published : Jan 17, 2023, 8:01 PM IST

तेलंगाणाचे मंत्री केटीआर यांचा जागतिक 30 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सोशल माध्यमात आपली वेगळी ओळख दाखवून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही यादी जाहीर केली आहे. त्यामुळे केटीआर यांचा या यादीत समावेश करण्यात आला. त्यांच्यासह आपच्या राघव चढ्ढा यांचाही या यादीत समावेश आहे.

KTR Top 30 Influencers
तेलंगाणाचे मंत्री केटीआर

हैदराबाद - तेलंगाणाचे आयटी मंत्री केटीआर यांना जगातील टॉप 30 नेत्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे. सोशल माध्यमातील टॉप इन्फ्लुएन्सर म्हणून त्यांचा जगातील टॉप 30 नेत्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मंत्री केटीआर यांना 30 नेत्यांच्या यादीत 12 वे स्थान मिळाले आहे. त्यामुळे तेलंगाणाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तर भारतातील दोनच नेत्यांचा या यादीत समावेश आहे. वर्ल्ड एकोनॉमिक फोरमने ही यादी जाहीर केली आहे.

राघव चढ्ढा दुसऱ्या स्थानावर जगातील 30 उत्कृष्ट प्रभावी व्यक्तींच्या यादीत भारतातील दोनच भारतीय नेत्यांचा समावेश आहे. यात पहिल्या स्थानावर तेलंगाणाचे मंत्री केटीआर यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या स्थानावर खासदार राघव चढ्ढा यांचा समावेश आहे. यात तेलंगाणातील मंत्री केटीआर हे आघाडीवर आहेत. केटीआर यांनी सोशल माध्यमात आपली वेगळी छाप पाडली आहे.

तेलंगणा आयटीच्या विकासासाठी काम तेलंगाणाचे मंत्री केटीआर यांनी आयटी मंत्री यांनी सोशल माध्यमात आपला विशेष प्रभाव पाडला आहे. आयटीच्या विकासासाठी काम करणाऱ्या मंत्री केटीआर यांनी सोशल माध्यमात आपली विशेष ओळख मिळवली आहे. वेळोवेळी लोकांशी संवाद साधून त्यांनी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. केटीआर यांनी सोशल माध्यमात राहून आपला वेगळा ठसा उमटवल्याने टीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. केटीआर यांचे जगभरातून कौतुक होत आहे. तेलंगाणात राहुन केटीआर यांनी जगभरात आपली ओळख वाढवली आहे. त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

आम आदमी पक्षाच्या राघव चढ्ढांचाही सन्मान आम आदमी पक्षाचे गुजरात प्रभारी राघव चढ्ढा यांचाही या यादीत समावेश आहे. त्यांनीही सोशल माध्यमात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राघव चढ्ढा हे आम आदमी पक्षातील विश्वासू नेते आहेत. आम आदमी पक्षाने त्यांना राज्यसभेवर खासदारकी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राघव चढ्ढा यांनी गुजरात निवडणुकीत आपला ठसा उमटवला होता.

हेही वाचा - J P Nadda tenure extend भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांना मुदतवाढ, अमित शाहांनी दिली माहिती

हेही वाचा - Shivsena Symbol Case : धनुष्यबाण चिन्हावर निर्णय नाहीचं, पुढील सुनावणी 20 जानेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.