ETV Bharat / bharat

तेलंगाणामधील शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती - मुख्यमंत्री चंद्रशेखर राव

कोरोना महामारीची स्थिती लक्षात घेता तेलंगाणा उच्च न्यायालयाने तेलंगाणा सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. रिपोर्टनुसार तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी 1 सप्टेंबरपासून राज्यातील शाळा, कॉलेज आणि सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याचे आदेश दिले होते.

तेलंगाणा शाळा
तेलंगाणा शाळा
author img

By

Published : Aug 31, 2021, 3:10 PM IST

हैदराबाद - तेलंगाणा उच्च न्यायालयाने 1 सप्टेंबरपासून शैक्षणिक संस्था उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तेलंगाणा सरकारने 1 सप्टेंबरपासून अंगणवाडी केंद्रासहित राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याची घोषणा केली होती.

कोरोना महामारीची स्थिती लक्षात घेता तेलंगाणा उच्च न्यायालयाने तेलंगाणा सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. रिपोर्टनुसार तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी 1 सप्टेंबरपासून राज्यातील शाळा, कॉलेज आणि सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. कोरोना-19 महामारीनुसार 30 ऑगस्टपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था आणि वसतीगृहांना स्वच्छता आणि साफसफाई करण्याचे तेलंगाणा सरकारने निर्देश दिले होते.

हेही वाचा-राजस्थान - बिकानेरमधील श्री बालाजी गावाजवळ अपघात, 11 जण ठार

दिल्ली सरकारकडून नववी ते बारावी इयत्तेपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची तयारी

कोरोना महामारीमुळे दिल्लीमधील शाळा सुमारे दोन वर्षांपासून बंद आहेत. दिल्ली सरकारने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळांमध्ये सॅनिटायझेशन आणि इतर पावले उचलण्यात येत आहे. दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने 1 सप्टेंबरपासून शाळा व महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांचा शपथविधी सोहळा संपन्न, इतिहासात प्रथमच

कोरोनाच्या नव्या विषाणुने बदलले स्वरुप-

दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस (एनआयसीडी) आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, हा विषाणू वेगाने पसरण्याची भीतीही सध्या व्यक्त केली जात आहे. हा विषाणू लसीकरणानंतरही जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.